International Friendship Day 2020 (Photo Credits: File Image)

हॅप्पी इंटरनॅशनल डे ऑफ फ्रेंडशिप! आज, 30 जुलै हा दिवस जगभरात International Day of Friendship म्हणून साजरा केला जातो. 2011 साली संयुक्त राष्ट्राच्या बैठकीमध्ये जगभरात राष्ट्रा-राष्ट्रांमध्ये, दोन समाजांमध्ये, संस्कृतीमध्ये मैत्री, शांती, सख्य आणि जिव्हाळा या सारख्या भावना वाढाव्या या उद्देशाने 30 जुलै हा दिवस जागतिक मैत्री दिन म्हणून साजरा करण्याला सुरूवात झाली आहे. त्यामुळे भारतीयांना आज (30 जुलै) हा जागतिक मैत्री दिन आणि ऑगस्ट महिन्यातील दुसरा रविवार म्हणजे यंदा 2 ऑगस्टचा दिवस हा मैत्रीचं नातं जपण्यासाठी आणि वृद्धिंगत करण्यासाठी मिळाला आहे. पण सध्या जगभरात कोरोना व्हायरसचं संकट घोंघावत असल्याने तुमच्या मनात असलं, लॉकडाऊनचा कंटाळा आला असला तरीही तुम्हांला बाहेर पडणं हे सुरक्षित नाही. मग त्याचा फटका तुमच्या यंदाच्या इंटरनॅशनल फ़्रेंडशिप डे सेलिब्रेशनला बसणार नाही हे लक्षात ठेवून प्लॅन बनवा. International Friendship Day 2020 Messages: जागतिक मैत्री दिनाच्या शुभेच्छा Wishes, Quotes, HD Images च्या माध्यमातून देऊन दृढ करा मैत्रीचंं नातं!

स्पेशल गिफ्ट्स

तुमच्या बेस्ट फ्रेंडला तुमच्यापेक्षा अधिक चांगलं तुमच्यशिवाय कुणीच ओळखू शकत नाही. मग यंदा ऑनलाईन गिफ्ट्सच्या माध्यमातून काही कस्टमाईज्ड गिफ्ट बनवा.

बेकिंग

कोरोना व्हायरस लॉकडाऊन सुरू झाल्यापासून नवनव्या रेसिपी बनवून पाहणं ही देखील मजेशीर गोष्ट झाली आहे. अनेकांनी याकाळात केक, कूकीज पासून अनेक पदार्थ घरच्या घरी बनवले असतील. मग यंदा व्हिडिओ कॉलच्या माधयामातून एखादी रेसिपी दोघांनी पण करून बघा.

मुव्ही नाईट

नेटफ्लिक्स आणि चिलिंग हा फंडा तुम्ही एकटेच का वापरणार? आजच्या दिवशी एखादी आवडती फिल्म किंवा शो तुम्ही दोघंही एकत्र पाहू शकता. तशी स्ट्रिमिंगची सोय नेटफ्लिक्सवर आहे!

व्हर्च्युअल पार्टी

तुम्ही अनेकदा एकत्र मिळून धुडगुस घातला असेल. पन लॉकडाऊनमध्ये हीच मस्ती तुम्ही व्हर्च्युअल माध्यमातून करू शकता. व्हिडिओ कॉल करा. एकत्र ऑनलाईन गेम खेळा.

इंटरनॅशनल डे ऑफ फ्रेंडशिप पाठोपाठचं येत्या रविवारी भारतामध्येही फ्रेंडशिप डे चं सेलिब्रेशन असेल. पण आनंदाचे हे क्षण साजरे करताना खबरदारी घेणं देखील आवश्यक आहे. त्यामुळे लॉकडाऊनमुळे अगदीच निराशदेखील होऊ नका आणि उत्सहाच्या भरात लॉकडाऊनचे नियम मोडून बाहेर देखील पडू नका. या कठीण परिस्थिती मधूनही सेलिब्रेशनचा मध्यम मार्ग तुम्ही काढू शकता.