Happy Dasara Wishes in Marathi: दसरा (Dussehra )अर्थात विजयादशमी (Vijaya Dashami) चा दिवस हिंदू धर्मीयांसाठी महत्त्वाचा आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या दिवशी सोनं लुटायची प्रथा आहे. नवरात्रोत्सवाची सांगता या विजया दशमी च्या सणाने होते. यंदा 24 ऑक्टोबरला विजयादशमी साजरी केली जाणार आहे. या निमित्ताने आप्तांना, नातेवाईकांना, मित्रमंडळींना दसर्याच्या शुभेच्छा देत या दिवसाचा आनंद द्विगुणित करायला विसरू नका. दसर्याच्या शुभेच्छा मराठमोळी शुभेच्छापत्रं, Messages, Wishes, Greetings द्वारा देत मित्रमंडळी, नातेवाईकांचीही आजची सकाळ खास करा.
पुराणकथेनुसार, दसर्याला रामाने रावणाचा वध केल्याने तसेच महिषासूराचा देवीने वध केल्याने आनंद उत्सव साजरा केला जातो. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने अनेक शुभ कार्याची सुरूवात या दिवशी केली जाते. Dussehra Rangoli Design: दसरा निमित्त घरासमोर काढा 'या' सुंदर आकर्षक आणि सोप्या रांगोळी .
दसर्याच्या हार्दिक शुभेच्छा (Happy Dussehra Shubhechha)
वाईटावर चांगल्याची मात
महत्व या दिनाचे असे खास
जाळोनिया द्वेष- मत्सराची कात
मनोमनी वसवी प्रेमाची आस
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
आपट्याची पाने, झेंडुची फुले,
घेऊनी आली विजयादशमी
दसऱ्याच्या आज शुभ दिनी,
सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी...
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा
संकल्प विजयाचा
उत्सव हर्षोल्हासाचा
दसरा सणाच्या
मंगलमय शुभेच्छा!
विजयादशमी च्या हार्दिक शुभेच्छा
साधूया लक्ष विकासाचे…
दसरा आणि विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
हॅप्पी दसरा स्टिकर्स
व्हॉट्सअॅप स्टिकर्सच्या माध्यमातून देखील आता तुम्ही दसर्याच्या शुभेच्छा देण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यासाठी आता गूगल प्ले स्टोअर वर देखील दसर्याच्या शुभेच्छा देण्यासाठी व्हॉट्सअॅप स्टिकर्सचा पॅक डाऊनलोड करता येईल.
दसर्या दिवशी सोनं खरेदी केली जाते. घरात सुख, समृद्धी सोबतच पैसा खेळत रहावा म्हणून लक्ष्मीचं पूजन केलं जातं. आपट्याची पानं सोनं म्हणूनही दिली जातात. घरात सरस्वतीचं पूजन केलं जातं सोबतच शस्त्रांची पूजा करण्याची देखील पद्धत आहे. मग या दसरा सणाचा आनंद विविध प्रकारे साजरा केला जातो. दसर्याच्या दिवशी रावण दहन देखील करून दृष्ट प्रवृत्तींवर मात करण्याची शिकवण दिली जाते.