Dev Diwali 2020 HD Images: देव दिवाळीच्या मराठमोळ्या शुभेच्छा Greetings, WhatsApp Status द्वारा देऊन साजरा करा कार्तिकी पौर्णिमेचा दिवस
Happy Dev Diwali 2020| Photo Credits: File Photo

Happy Dev Diwali 2020: दिवाळीच्या दिवसानंतर 15 दिवसांनी देव दिवाळी साजरी करण्याची प्रथा आहे. यंदा हा सण 29 नोव्हेंबर दिवशी साजरा केला जाणार आहे. भारतभर विविध समजात विविध धार्मिक रुढी-परंपरांनुसार देव दिवाळी किंवा देव दीपावलीचा सण साजरा केला जातो. पण धार्मिक कथांनुसार देवांना त्रास देणार्‍या त्रिपुरासूराचा वध केल्यानंतर कार्तिकी पौर्णिमेला सार्‍या देव देवतांनी दिव्यांची आरास करून हा विजय साजरा केला होता. त्यामुळे त्रिपुरारी पौर्णिमेचा दिवस देव दिवाळी म्हणून देखील ओळखला जातो. या दिवसाचं औचित्य साधून सर्वत्र दिव्यांची आरास करण्याची पद्धत आहे. पण यंदा कोरोना संकटामुळे तुम्ही घराबाहेर पडून हा देव दिवाळीच्या सण प्रियजनांसोबत साजरा करण्यावर बंधनं असली तरी देव दिवाळीच्या शुभेच्छा तुम्ही मराठी संदेश, देव दिवाळीच्या शुभेच्छा देणारी शुभेच्छापत्र, Wishes, Messages WhatsApp Status, Facebook Messages यांच्या द्वारा शेअर करून सणाचा आनंद द्विगुणित करू शकता. (Tripurari Purnima 2020 Date: त्रिपुरारी पौर्णिमा यंदा कधी? जाणून घ्या कार्तिकी पौर्णिमेचं महत्त्व ).

महाराष्ट्रात कोकण प्रांतात कार्तिकी एकादशी पासून पौर्णिमेपर्यंत 5 दिवस देव दिवाळी साजरी केली जाते. बळीच्या राज्यातून भगवान विष्णू आपल्या मूळ स्थानी परत आल्याने हा काळ आनंदोत्सवाच्या रूपात साजरा करताना दिव्यांची आरास केली जाते.

देव दिवाळीच्या शुभेच्छा

Happy Dev Diwali 2020| Photo Credits: File Photo
Happy Dev Diwali 2020| Photo Credits: File Photo
Happy Dev Diwali 2020| Photo Credits: File Photo
Happy Dev Diwali 2020| Photo Credits: File Photo
Happy Dev Diwali 2020| Photo Credits: File Photo
Happy Dev Diwali 2020| Photo Credits: File Photo
Happy Dev Diwali 2020| Photo Credits: File Photo
Happy Dev Diwali 2020| Photo Credits: File Photo

हिंदू पुराण कथांनुसार त्रिपुरारी पौर्णिमेला भगवान विष्णू आणि शंकर यांची देखील भेट होते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे या दोन्ही देवांना प्रसन्न करून त्यांचे आशिर्वाद घेण्यासाठी भाविक घराघरात दिव्यांची आरास करतात. प्रामुख्याने उत्तर भारतामध्ये काशी घाटावर, गंगेच्या तीरावर भव्य दीपोत्सव देखील साजरा करण्याची पद्धत आहे.