महाराष्ट्रामध्ये चैत्र शुक्ल प्रतिपदा हा शालिवाहन शकवर्षाचा पहिला दिवस 'गुढी पाडवा' म्हणून साजरा केला जातो. त्याचप्रमाणे या दिवसापासून चैत्र नवरात्र साजरी करण्याची पद्धत आहे. महाराष्ट्रासह देशभरात यंदा 25 मार्च ते 2 एप्रिल पर्यंत चैत्र नवरात्र साजरी केली जाणार आहे. शारदीय नवरात्रीप्रमाणे सृष्टीतील नवसृजनाचा हा काळ मंगलमय वातावरणामध्ये साजरा केला जातो. यंदा सर्वत्र कोरोना व्हायरसचं संकट आहे. त्यामुळे यंदा नवरात्रीमध्ये तुम्ही तुमच्या प्रियजनंसोबत, नातेवाईकांसोबत तसेच मित्रमंडळींसोबत हा सण साजरा करू शकत नाही. पण या संयमाच्या काळात तुम्ही व्हॉट्सअॅप, फेसबूक मेसेज स्टेटसच्या माध्यामातून मात्र खास मराठमोळी शुभेच्छापत्र, ग्रीटींग्स, मेसेज, HD Images, Wallpapers च्या माध्यमातून चैत्र नवरात्रीच्या शुभेच्छा देऊन या सणाचा आनंद द्विगुणित करू शकता. यंदा घरातच राहून सण साजरा करायचा आहे त्यामुळे सारे अमंगल दूर होवो अशी प्रार्थना करत आपल्या सार्यांवरील संकट दूर करण्यासाठी, चैत्र नवरात्रीच्या शुभेच्छा देणारी ही खास ग्रीटींग्स शेअर करून आजचा सण उत्साहात साजरा करा. Gudi Padwa 2020 Messages: गुढी पाडव्याच्या शुभेच्छा मराठमोळ्या Wishes, Greetings, Whatsapp Stickers, Images च्या माध्यमातून Facebook, WhatsApp वर शेअर करून जल्लोषात करा नववर्षाचं स्वागत!
चैत्र नवरात्रीच्या शुभेच्छा
चैत्र पाडवा हा शालिवाहन शकवर्षाचा पहिला आहे. हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवसाला विशेष महत्त्व आहे. सोबतच चैत्रगौर हा सणानिमित्ताने आलेला नववर्षातील पहिला उत्सव आहे. चैत्र पाडव्या पाठोपाठ चैत्र शुक्ल तृतीयेला चैत्रगौरी देव्हार्यात बसवली जाते आणि पुढे अक्षय्य तृतीया म्हणजे वैशाख शुक्ल तृतीयेपर्यंत देवीची आराधना केली जाते. मग आजपासून सुरू होणारं हे नवं मराठी वर्ष अधिक समृद्धीचं, आरोग्यदायी, ऐश्वर्यसंपन्न जावो हीच प्रार्थना करत आमच्याकडून तुम्हांला चैत्र नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!