
Happy Bhogi 2023 Wishes: भोगी हा चार दिवसीय मकर संक्रांती सणाचा पहिला दिवस आहे. हा सण हिंदू सौर कॅलेंडर महिन्याच्या अग्रहायण किंवा मार्गशीर्ष किंवा खरमासच्या शेवटच्या दिवशी साजरा केला जातो. ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार, हा दिवस सहसा 13 जानेवारी रोजी साजरा केला जातो. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र आणि श्रीलंका येथे हा मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणारा सण आहे. भोगीच्या दिवशी लोक जुन्या गोष्टी विसरतात आणि परिवर्तनासाठी प्रयत्न करतात. या दिवशी 12 वस्तूपासून बनवलेली खास भाजी बनवली जाते.
महाराष्ट्रात भोगीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याशिवाय या दिवशी एकमेकांना शुभेच्छा देखील दिल्या जातात. भोगीनिमित्त Messages, Greetings, HD Images, Wallpaper, WhatsApp Status च्या माध्यमातून तुम्ही देखील आपल्या मित्र-परिवारास खास दिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करू शकता. (हेही वाचा -Makar Sankranti 2023 Sugad Puja Vidhi: मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजन कसे करावे? महत्त्व आणि पूजाविधी जाणून घ्या)
नाते अपुले
हळुवार जपायचे…
तिळगुळ हलव्याच्या गोडी सोबत
अधिकाधिक दॄढ करायचे…
भोगी आणि मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

आपणांस व आपल्या परिवाराला
भोगी सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

दु: ख असावे तीळा सारखे
आनंद असावा गुळासारखा
तुमचे अवघे जीवन असावे तीळगुळासारखे
भोगी व मकर संक्रांत सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

संक्रांतीचा पहिला सण
'भोगी' च्या तुम्हांला हार्दिक शुभेच्छा!

नवीन वर्षाच्या
नवीन सणाच्या
प्रियजनांना, गोड व्यक्तींना
भोगीच्या हार्दिक शुभेच्छा!

यंदा मकर संक्रातीचा सण 14 जानेवारीला साजरा होत आहे. त्याच्या एक दिवस आधी भोगीचा सण साजरा करण्याची पद्धत आहे. या दिवशी सूर्यदेवाची विशेष पूजा केली जाते. श्रद्धा आणि समृद्धीचे प्रतीक असलेला मकर संक्रातीचा सण चार दिवस साजरा केला जातो.