यंदाच्या दिवाळीच्या वेळापत्रकानुसार, मंगळवारी 29 ऑक्टोबर रोजी भाऊबीजेचा (Bhaubeej) मुहूर्त आहे. बहीण भावाच्या नात्याची गाठ आणखीनच घट्ट करणारा हा सण दरवर्षी मोठ्या उत्साहात पार पडतो. काही वेळेस शिक्षण किंवा कामानिमित्त एकमेकांपासून दूर राहणाऱ्या भावंडाना एकत्र भेटण्यासाठी हा सण निमित्त सुद्धा देऊन जातो. कोणत्याही सर्वसाधारण घराची स्थिती बघायला गेलं तर एकाच घरात राहत असतानाही भाऊ बहीण नेहमीच गोड किंवा प्रेमाने बोलताना दिसत नाहीत साहजिकच यामागे कोणताच द्वेष नसून ही भावंडांमधील मजा मस्ती असते. मात्र निदान या एकेदिवशी आपल्या भावंडांला आपल्या प्रेमाची जाणीव करून द्यावी यासाठी भाऊबीज साजरी केली जाते. यंदा तुमच्याकडे सुद्धा हा सोहळा उत्साहात पार पडणार असेलच, पण तत्पूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही आपल्या भावंडाना शुभेच्छा देऊन हा दिवस आणखीन खास करू शकता.
तुमच्या बहीण किंवा भावाला पाठवण्यासाठी यावेळेस तुम्हाला शुभेच्छापत्र शोधायची गरज नाही आम्ही ही काही खास मराठमोळी ग्रीटिंग्स, Whatsapp Messages , Images तुमच्यासाठी एकाच ठिकाणी घेऊन आलो आहोत. या शुभेच्छापत्रांना मोफत डाउनलोड करून Faecbook Instagram, Whatsapp Status वरून तुमच्या भावा बहिणीसोबत नक्की शेअर करा..
भाऊबीजेच्या दिवशी बहिण भावाला का ओवाळते ?
रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन,
लाख लाख शुभेच्छा तुला आज आहे
बहीण भावाचा पवित्र सण…
भाऊबीज च्या हार्दिक शुभेच्छा
जिव्हाळ्याचे संबंध दिवसागणिक
उजळत राहू दे!
भावा-बहिणीची साथ
आयुष्यभर अतूट राहु दे…
भाऊबीजेच्या शुभेच्छा!
सोनियाच्या ताटी
उजळलल्या ज्योती
ओवाळीते भाऊरायाला
वेड्या बहिणीची वेडी ही माया
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा
सण बहीण भावाचा
आनंदाचा उत्साहाचा
निखळ मैत्रीचा.. अतूट विश्वासाचा
ही नाती अशीच आयुष्यभर टिकून राहोत या सदिच्छा
दिवाळी आणि भाऊबीजेच्या खूप शुभेच्छा.
दिवाळीचे हे दिवे लखलखते
उजळून टाकू दे बंध प्रेमाचे
चिरंतर राहो आपले नाते बहीण भावाचे
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा
भाऊबीजेला 'यमद्वितीया' असे सुद्धा म्हटले जाते.आपल्या भावाचे आयुष्य वाढावे म्हणून बहिणीने या दिवशी यमाची पूजा आणि प्रार्थना करायाची असते.यमाच्या पाशातून आपल्या प्रिय बंधूची व तो सुरक्षित राहावा हा यामागचा हेतू असतो. एखाद्या मुलीस जवळचा भाऊ किंवा अगदी दूरचा भाऊही नसल्यास तिने चंद्राला आपला भाऊ मानून त्याला ओवाळावे अशी पद्धत आहे.