Photo Credit: YouTube

रांगोळी ही भारताची प्राचीन सांस्कृतिक परंपरा आणि लोक-कला आहे.भारताच्या वेगवेगळ्या प्रांतात रांगोळीचे वैविध्य दिसून येते पण त्यामागील निहित भावनेत आणि संस्कृतीमध्ये बरीचशी समानता आहे.परंपरा, लोकसाहित्य आणि प्रत्येक क्षेत्रासाठी खास असलेल्या पद्धती प्रतिबिंबित केल्यामुळे डिझाईनचे वर्णनदेखील भिन्न असू शकते. हे पारंपरिकपणे मुली किंवा महिलांनी केले आहे. साधारणता सण, शुभ उत्सव, विवाह उत्सव आणि इतर मेळावे यासारख्या प्रसंगांमध्ये रांगोळ्या काढतात.नवीन वर्षाच्या सुरवातीला महिलांसाठी असलेला खास कार्यक्रम म्हणजे हळदी कुंकू. या समारंभासाठी दारापुढे , अंगणात सुंदर रांगोळी आवर्जून काढली जाते. आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत खास हळदी कुंकूवाच्या दिवशी काढता येतील अशा सोप्या रांगोळी डिझाइन. (Haldi Kumkum 2021 Mehandi Design: हळदी कुंकूवाच्या दिवशी हातावर काढा या सुंदर मेहंदी डिझाइन)

हळदी कुंकू स्पेशल रांगोळी डिझाइन 

हळदी कुंकू स्पेशलपैठणी साडी रांगोळी  

हळदी कुंकू स्पेशल पानांची रांगोळी  

हळदी कुंकू स्पेशल छोटी रांगोळी

सुवासिनी महिला एकत्र येऊन हा समारंभ साजरा करतात.यामध्ये एक महिला आपल्या घरी हळदी कुंकू समारंभ आयोजित करते आणि त्याला अन्य महिलांना बोलावते. यामध्ये विशिष्ट पूजा, सण यानिमित्ताने महिलांना आमंत्रित करून त्यांना कपाळावर हळद आणि कुंकू लावले जाते.पान-सुपारी दिली जाते.अत्तर लावले जाते,अंगावर गुलाबपाणी शिंपडले जाते. काही प्रसंगी ओटीही भरली जाते.