Haldi Kumkum 2021 Mehandi Design: हळदी कुंकूवाच्या दिवशी हातावर काढा या सुंदर मेहंदी डिझाइन 
Photo Credit : YouTube ,Instagram

कोणत्याही विशेष आणि खास प्रसंगी त्यांच्या हातावर मेहंदी काढतात।मेहंदीला त्या प्रसंगानुसार शुभ मानले जाते. हिंदूंमध्ये मेहंदी लावण्याचे विशेष महत्त्व आहे. अनेकदा महिला उत्सवात मेहंदी लावून आनंद व्यक्त करतात. लग्न असो, उत्सव असो किंवा इतर काही खास कार्यक्रम असो, मेहंदी उत्सवाची शोभा वाढवते. त्यामुळे छोट्यातल्या छोट्या प्रसंगीही महिला हातावर मेहंदी काढणे पसंत करतात. नवीन वर्षात महिलांचा हक्काचा कार्यक्रम म्हणजेच हळदी कुंकू साजरा केला जातो. या खास प्रसंगासाठी महिला आवर्जून मेहंदी काढतात. आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत खास हळदी कुंकूवाच्या दिवशी काढता येतील अशा सोप्या आणि सुंदर मेहंदी डिझाइन.  (स्ट्रेच मार्क लपवण्यासाठी Make Up च्या 'या' टीप्स येतील कामी, जाणून घ्या अधिक)

फुलांची मेहंदी डिझाइन

अरेबिक मेहंदी डिझाइन 

फ्लोरल अरेबिक मेहंदी डिझाइन 

सेमी ब्राइडल मेहंदी डिझाइन 

आहेत की नाही सोप्या आणि तुम्हाला काढायला जमू शकतील अशा मेहंदी डिझाइन.तेव्हा यंदा हळदी कूंकुवाच्या दिवशी नक्की यातील एक मेहंदी डिझाइन हातावर काढा.