Hajj Yatra (Photo Credits-Facebook)

सौदी अरेबियाने (Saudi Arabia) ने सांगितले आहे की, कोरोना विषाणूच्या साथीमुळे यावर्षी 60 हजाराहून अधिक लोकांना हजला (Hajj Pilgrimage 2021) परवानगी दिली जाणार नाही. महत्वाचे म्हणजे हे सर्व स्थानिक नागरिक किंवा रहिवासी असणार आहेत. हज यात्रेला जाणाऱ्या सर्वांना लसीकरणाचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल. सरकारद्वारे चालवलेल्या सौदी प्रेस एजन्सीच्या माध्यमातून सौदी अरेबियाने शनिवारी ही घोषणा केली. हज आणि उमराह मंत्रालयाच्या निर्णयाचा हवाला देत त्यांनी ही माहिती दिली आहे. मागील वर्षी सौदी अरेबियात आधीपासून राहणाऱ्या सुमारे एक हजार लोकांना हजसाठी निवडले गेले होते. जुलैच्या मध्यापासून हज यात्रा सुरू होते.

हज मंत्रालयाने म्हटले आहे की यावर्षी केवळ 60 हजार लसीकरण झालेल्या आणि 65 वर्षांखालील लोकांना हजला जाण्याची परवानगी आहे. याशिवाय या लोकांमध्ये आजारपणाचे कोणतेही लक्षण असू नयेत असे सांगितले आहे. कोरोना विषाणूच्या साथीमुळे सलग दुसऱ्या वर्षी हज यात्रेसाठी परदेशी लोकांवर बंदी घालावी लागली आहे. साधारणपणे जगभरातील 20 लाख मुस्लिम दरवर्षी हजमध्ये भाग घेतात. मुस्लिम समुदायाचा असा विश्वास आहे की त्यांनी एकदातरी हज यात्रेला जायला हवे.

आठवडाभर चालणाऱ्या या धार्मिक यात्रेमुळे सौदी अरेबिया सरकारला दरवर्षी सुमारे 12 अब्ज डॉलर्स (सुमारे 90 हजार कोटी रुपये) उत्पन्न मिळते. अलीकडेच केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी हज यात्रेसंदर्भात सुरू असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर सांगितले की, हज यात्रेसंदर्भात सौदी अरेबियाने घेतलेला निर्णय भारत मान्य करेल. (हेही वाचा: यंदा फक्त 60 हजार स्थानिकांना हज यात्रेची परवानगी; Saudi Arabia चा मोठा निर्णय)

दरम्यान, मुस्लीम लोकांसाठी मक्का आणि मदिना (Mecca Madina) या दोन तीर्थस्थळांचे फार मोठे महत्व आहे. या ठिकाणी हज तीर्थयात्रा इस्लामिक कॅलेंडरचा 12 वा आणि शेवटचा महिना धू अल हिज्जाह च्या 8 ते 12 तारखेपर्यंत भरते. मुस्लिम आस्थाचे संस्थापक पैगंबर मोहम्मद यांचा जन्म मक्का शहरात 570 मध्ये झाला होता. पुढे घडलेल्या मतभेदामुळे पैगंबर मदिनेला निघून गेले. इथेच त्यांनी देह ठेवला व त्यांची कबरही इथेच बांधण्यात आली.