Gold & Silver Rate in Maharashtra: दिवाळीच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या सोनं, चांदीचा दर
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: IANS)

Gold & Silver Rate in Maharashtra: 27 ऑक्टोबरला म्हणजे रविवारी दिवाळीचा सण (Diwali 2019) साजरा होणार आहे. दिवाळीचा सण हिंदू धर्मियांसाठी मोठा उत्साहाचा, आनंदाचा, जल्लोषाचा सण दिवस असतो. या दिवशी सोनं खरेदीला महत्त्व असते. तसेच दिवाळी अगोदर येणाऱ्या धनतेरसच्या (Dhanteras) दिवशीही सोनं खरेदीला विशेष महत्त्व असतं. यंदा देशावर मंदीचे सावट असले तरी लोकांनी सोनं खरेदीला चांगला प्रतिसाद दिला आहे. दिवाळीच्या दिवशी सोनं, चांदीची खरेदी करणे शुभ मानले जाते. तुम्हीही या दिवाळीला सोनं खरेदीचा विचार करत असाल तर पहा आज मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरमध्ये सोनं आणि चांदीचा दर काय आहेत.

 हेही वाचा - Diwali 2018 : दिवाळी गिफ्ट अविस्मरणीय बनवतील या '7' वस्तू

दिवाळी पाठोपाठ लग्नसराई देखील सुरू होत असल्याने अनेक घरामध्ये सोनं खरेदीला सुरूवात केली जाते. त्यामुळे आजच्या दिवशी शुभ मुहूर्त साधत सोनं खरेदीसाठी नक्की बाहेर पडा. शुक्रवारी सोनं प्रति तोळा 38,800 रु. होते. आज सोन्याच्या दरात 10 रुपयांची वाढ झाली आहे.

महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर मध्ये सोन्याचा दर काय?

मुंबई - ₹ 38,810/ प्रति तोळा

पुणे - ₹ 38,810/ प्रति तोळा

नाशिक - ₹ 38,810/ प्रति तोळा

नागपूर - ₹ 38,810/ प्रति तोळा

हेही वाचा - Diwali 2018 : मिठायांवरील चांदीचा वर्ख भेसळयुक्त तर नाही ना ? या'4' सोप्या टेस्टने घरच्या घरीच ओळखा

चांदीचा दर मुंबई, नाशिक, नागपूर, पुणे शहरामध्ये किती?

सोन्यापेक्षा चांदीचे दर अधिक वाढले असून मुंबई, नाशिक, नागपूर, पुणे शहरासह अन्य ठिकाणी दर 48,770 प्रति किलो राहिले आहेत.

दिवाळीच्या दिवशी तुम्ही सोनं खरेदी करणार असाल, तर सराफ दुकानदार तुम्हाला खास ऑफरही देत असतात. त्यामुळे तुमच्या ओळखीच्या आणि खात्रीच्या दुकानदाराकडेचं सोनं खरेदी करा. ज्यामुळे तुम्हाला विशेष सुट मिळेल. तुम्हाला ही दिवाळी सुख, शांती आणि समृद्धीची जावो. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

टीप: हे दर गुड रिटर्न्स (Good₹Returns) वेबसाईटनुसार दिले आहेत.