
Happy Daughters Day 2022 Messages: भारतात जागतिक कन्या दिवस (Daughters Day 2022) प्रत्येक वर्षी सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या रविवारी साजरा केला जातो. यंदा हा दिवस 25 सप्टेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. भारताबरोबरचं परदेशातही कन्या दिवस ((Daughters Day) मोठ्या उत्सहात साजरा केला जातो. परंतु, इतर देशात वेगवेगळ्या तारखांना कन्या दिन म्हणून साजरा केला जातो.
कन्यादिनानिमित्त जर तुम्ही आपल्या लेकीसाठी काही शब्दरचना शोधत असाल तर खालील ईमेज तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. येथे आम्ही तुमच्यासाठी काही खास निवडक अशा कन्या दिनाच्या शुभेच्छा संदेश पोस्ट केल्या आहेत. या ईमेज तुम्ही डाऊनलोड करून आपल्या गोड लेकीला जागतिक कन्या दिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता...(हेही वाचा - Daughters Day 2022 Date: जागतिक कन्या दिवस कधी आहे? हा दिवस साजरा करण्यामागचा इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या)
आज जागतिक कन्या दिन
ज्यांना कन्या रत्न आहेत अशा
सर्वांना जागतिक कन्या
दिनाच्या मनापासून शुभेच्छा

ती आई आहे, ती ताई आहे
ती मैत्रीण आहे, ती पत्नी आहे
ती मुलगी आहे,ती जन्म आहे
ती माया आहे तीच सुरुवात आहे
आणि सुरुवात नसेल तर बाकी
सर्व व्यर्थ आहे
जागतिक कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मुलगी म्हणजे आनंद मुलगी म्हणजे
चैतन्य मुलगी म्हणजे ज्योती मुलगी
म्हणजे सौख्याच औक्षण…
जागतिक कन्या दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

स्वागत तुझे मी कसे करावे
अचंबित हे सारे जग व्हावे
तुझ्या गोड हास्याने जीवन
माझे फुलुनी जावे
जागतिक कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

लक्ष्मीच्या पावलांनी जी घरात येते
जिच्या पैंजनांनी सारे घर निनादते
जिचे बोबडे बोल मन प्रसन्न करते
हे सर्व सुख त्याच्याच नशिबी येते
ज्याच्या घरी मुलगी जन्माला येते
जागतिक कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

वरील ईमेज डाऊनलोड करून तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट करून आपल्या लेकीला जागतिक कन्या दिनाच्या शुभेच्छा देऊ शकता.