महाराष्ट्रामध्ये भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणेशाचे पार्थिव पूजन करण्याची पद्धत आहे. या निमित्ताने घराघरामध्ये गणरायाची मूर्ती आणून तिची विधिवत पूजा केली जाते. किमान दीड दिवस ते 7-10 दिवस घरांघरांमध्ये गणपती बाप्पा विराजमान होत असतात. यंदा बाप्पाचं आगमन 31 ऑगस्ट दिवशी होणार आहे. आता कोरोनाचं संकट पूर्णपणे आटोक्यात आले असल्याने निर्बंधांची मर्यादा शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे पूर्ण मोकळ्या वातावरणामध्ये आणि तितक्याच जल्लोषामध्ये गणेशोत्सव तब्बल 2 वर्षांनी रंगणार आहे. मग यंदा जोशात गणपतीच्या आगमनाची तयारी करताना पहा बाप्पाच्या पूजेची गणेश चतुर्थी दिवशी वेळ काय? नक्की वाचा: Ganeshotsav 2022 Dates: हरतालिका, ज्येष्ठा गौरी पूजन ते अनंत चतुर्दशी यंदा गणेशोत्सवातील पहा महत्त्वाच्या सणांच्या तारखा!
गणेश चतुर्थी 2022 गणेश पूजन वेळ
भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच यंदा 31 ऑगस्ट दिवशी घराघरामध्ये बाप्पा विराजमान होणार आहे. पंचागकर्ते दा कृ सोमण यांच्या माहितीनुसार, बुधवार 31 ॲागस्ट रोजी सकाळी 11.25 पासून दुपारी1.55 पर्यंत मध्यान्हकाळ आहे. गणेश पूजनासाठी मध्यान्हकाळ महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे यावेळेत पूजा केली जाऊ शकते. गणरायाच्या आगमनापाठोपाठ महराष्ट्रात गणेशोत्सवात गौराई अर्थात गणपती बाप्पाची आई पार्वती मातेचंही आगमन होतं. माहेराला आलेल्या मुलीप्रमाणे गौराईचं देखील कोड कौतुक, पुजा, मान सन्मान करण्याची रीत आहे. नक्की वाचा: Ganpati Invitation Messages Format In Marathi : गौरी-गणपती आमंत्रण मित्रमंडळी, आप्तांना देऊन यंदा बाप्पाच्या दर्शनाला त्यांना घरी बोलावण्यासाठी WhatsApp Messages!
गौराई पूजन वेळ
3 सप्टेंबरला गौरी आणल्या जाणार अअहे. अनुराधा नक्षत्रामध्ये गौरी आणली जाते त्यामुळे शनिवारी रात्री 10.56 पर्यंत ती कधीही आणली जाऊ शकते. त्यानंतर 4 सप्टेंबरला दिवसभर गौरी पूजन केले जाऊ शकते. गौरी-गणपती असलेल्यांना चंद्र मूळ नक्षत्रात असताना विसर्जन करावं लागत असल्याने 5 सप्टेंबरला ते रात्री 8.05 पर्यंत केले जाऊ शकतं.
गणपती ही विद्येची देवता असल्याने तसेच कोणत्याही शुभ प्रसंगात त्याची पहिली पूजा करण्याचा मान असल्याने गणेशोत्सवामध्येही बाप्पाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी असते.