Gatari Amavasya 2022 Date: गटारी अमावस्येची तारीख आणि का साजरी केली जाते, जाणून घ्या

Gatari Amavasya 2022 Date in Maharashtra: हिंदू धर्मात श्रावण महिन्याला खूप महत्व दिले जाते. महाराष्‍ट्रात 29 जुलै पासून श्रावण महिना सुरु होणार आहे. श्रावण सुरु होण्याच्या एक दिवस अधि गटारी अमावस्या साजरी केली जाते. यावर्षी गटारी अमावस्या 28 जुलै रोजी आहे. श्रावण महिन्यात अनेक कठोर नियम पाळले जातात आणि हिंदू लोक या प्रथा परंपरांचे कटाक्षाने पालन करतात. संपूर्ण श्रावण महिन्यात मासाहार करत नाही. श्रावण महिन्यात पूर्णपणे मासाहार बंद करावा लागतो आणि शुद्ध सात्विक शाकाहारी अन्न खावे लागते. श्रावणात बरेच लोक संपूर्ण महिना उपवास करतात. श्रावण महिना हा पवित्र महिना मानला जातो त्यामुळे लोक मांसाहार, अल्कोहोलयुक्त पेये आणि कांदा आणि लसूण यांसारखे तामसिक पदार्थ कटाक्षाने  टाळतात. त्यामुळे श्रावण महिना सुरु होण्यापूर्वी लोक मांसाहार करून श्रावणातील सर्व प्रथा पाळण्यासाठी सज्ज होतात. त्यामुळे   महाराष्ट्रात गटारी अमावास्या साजरी केली जाते. [ हे देखील वाचा:- Kande Navami 2022: कांदा नवमीनिमित्त बनवा कांद्याचे चमचमीत पदार्थ, कुरकुरीत पदार्थ पाहून तोंडाला सुटेल पाणी, पाहा व्हिडीओ]

 गटारी अमावस्याचे  2022 महत्त्व (Gatari Amavasya 2022 Importance)

श्रावणाच्या स्वागतासाठी लोक गटारी सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. गटारीच्या दिवशी, लोक जवळचे मित्र आणि प्रियजनांसह स्वादिष्ट मांसाहारी पदार्थाचा आस्वाद घेतात कारण श्रावण सुरु झाल्यानंतर मास खाणे चुकीचे मानले जाते.  कारण पावसाळ्यात येणाऱ्या श्रावण महिन्यात आजारांचा धोका जास्त असतो. त्यामुळे लोक हलके अन्न खाण्यास प्राधान्य देतात. गटारी सणाच्या दिवशी, कुटुंबे दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत मेजवानीचा आणि पेयांचा आनंद घेण्यासाठी एकमेकांच्या घरी जातात. श्रावणमध्ये वेगवेगळ्या पूजा, व्रत आणि उपवास केले जातात. गटारीचा अर्थ अमर्यादपणे सेवन करणे असे केले जाते. त्यामुळे तुम्ही गटारी अमावस्येला पोट भरून खाऊ शकता. दरम्यान गटारी अमावस्या साजरी करण्यासाठी काही मासाहारी पदार्थाचे व्हिडीओ घेऊन आलो आहोत. गटारी अमावास्या निमित्त लज्जतदार मासाहाराचा आनंद घ्या. आम्ही खास तुमच्यासाठी काही झटपट रेसेपी घेऊन आलो आहोत...

पाहा व्हिडीओ :-

चिकन फ्राई

चिकन कबाब

हैदराबादी चिकन मसाला

चिकन गार्लिक टोस्ट

मटन बिर्याणी

गटारी अमावास्यानिमित्त मासाहाराचा आनंद घ्या आणि स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घ्या