Kande Navami 2022: कांदा नवमीनिमित्त बनवा कांद्याचे चमचमीत पदार्थ, कुरकुरीत पदार्थ पाहून तोंडाला सुटेल पाणी, पाहा व्हिडीओ

आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi 2022)  जवळ आली आहे. आषाढी एकादशी 10 जुलै, रविवारी रोजी आहे. दरम्यान, चातुर्मासला लवकरच सुरवात होणार आहे. आषाढी शुध्द एकादशीपासून ते कार्तिकी शुध्द एकादशीपर्यंत चातुर्मास असतो. चातुर्मास दरम्यान कांदा, लसूण, वांगी इत्यादींचे सेवन करत नसतात. त्यामळे चातुर्मासची सुरवात होण्यापूर्वी कांदे नवमी साजरी केली जाते, कारण पुढे चार महिने कांद्यापासून बनवलेल्या चमचमीत पदार्थावर ताव मारता येणार नाही. कांदे नवमी आषाढी एकादशीच्या दोन दिवस आधी साजरी केली जाते आणि कांद्यापासून बनवलेल्या लज्जतदार पदार्थांचा आस्वाद घेतला जातो. कांदे नवमी 8 जुलै शुक्रवारी रोजी आहे. कांदे नवमी, ज्याला आषाढ शुद्ध नवमी असेही म्हणतात. हे देखील वाचा:- Ashadhi Ekadashi 2022: संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीला सातारा प्रशासनाने दिला निरोप (Watch Video)

कांदा नवमी चे महत्व

पावसाळ्यात कांदा सडतो म्हणून चातुर्मास दरम्यान कांद्याचे सेवन टाळले जाते. कांद्यासोबतच लसूण, वांगं हे सुद्धा खाल्ली जात नाही. त्या मागील खरे कारण म्हणजे  नैसर्गिकरित्या पावसाला ऋतूमध्ये शरीरामधील वाताचे प्रमाण वाढते. त्यामुळे आहारात वातूड पदार्थ टाळण्याचा नियम आहे.

कांद्यापासून झटपट बनवता येतील असे हटके पदार्थ, पाहा व्हिडीओ 

कुरकुरीत कांदाभजी

कांदा स्प्रिंग रोल

कुरकुरीत चीज कांदा 

कुरकुरीत कांदा रिंग 

कांदा  डिश 

दरम्यान, राज्यात पावसाला चांगलाच दमदार सुरु झाला आहे. त्यामुळे झटपट कुरकुरीत कांद्याचे पदार्थ करा आणि खिडकीतून पावसाचा आनंद घेतांना, मातीचा मंद सुवास घेतांना कुरकुरीत पदार्थाचा आनंद घ्या