Gatari Amavasya Wishes in Marathi : महाराष्ट्रात येत्या 2 ऑगस्ट 2019 पासून श्रावणाची (Shravan 2019) नांदी होईल. श्रावण सुरु होताच पाठोपाठ सणांची रेलचेल सुरु होते या कालावधीत अनेक घरांमध्ये मांसाहार निषिद्ध मानला जातो, पण यामध्ये नॉनव्हेज प्रेमी मंडळींची अक्षरशः दैना होते. हा पवित्र महिना सुरु होण्याआधीच चिकनचा रस्सा, मटण आणि माशांच्या बेतावर ताव मारण्याची एक शेवटची संधी गटारी (Gatari) च्या रूपात तुमच्या हातात आहे. महाराष्ट्रातील घरोघरी यंदा गटारीचं सेलिब्रेशन बुधवारी म्हणजेच 31 जुलै ला होणार आहे. खरंतर गटारी सेलिब्रेशन साठी चमचमीत बेत आणि सोबत मित्रांच्या पार्ट्या हा फंडा नेहमीच हिट मानला जातो. पण यावेळेस गटारी नेमकी आठवड्याच्या मधल्या वारी आल्याने जर का तुम्हाला मित्रांची प्रत्यक्ष भेट घेणे शक्य नसेल तरी काळजी करण्याचे कारण नाही .WhatsApp Status, Facebook Messenger च्या माध्यमातून ही काही मराठमोळी हटके Greetings And Messages शेअर करून तुम्ही गटारीच्या मजेशीर शुभेच्छा देऊ शकता. Gatari Special : गटारी साजरी करण्यासाठी महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यातील मसालेदार चिकन रेसिपीज
गटारी स्पेशल मजेशीर मेसेजेस
संपली आहे नुकतीच आषाढीची वारी
काही दिवसात येणार बाप्पांची स्वारी
मग दिवाळी, दसरा मागोमाग सणांची बारी
थोडेच दिवस आहे हातात
त्याआधी जोशात साजरी करू गटारी
गटारी अमावास्येच्या हार्दिक शुभेच्छा!
कोंबडीचा रस्सा मटणाची साथ
मच्छीची आमटी आणि बिर्याणी भात
बोम्बिलाची कढी भरलेलं ताट,
खाऊन घ्या सगळं,
श्रावण महिना यायच्या आत…
गटारीच्या हार्दिक शुभेच्छा!
ओकू नका मातु नका
मटणावर ताव मारू नका
फुकट मिळतेय म्हणून ढोसू नका
झिंगून गटारात लोळू नका
गटारीच्या क्वार्टरभर शुभेच्छा
आली आली गटारी
खाण्यापिण्याचा बेत करा लय भारी
एकाच दिवसात लुटून घ्या
महिन्याभराची मौज सारी
गटारीच्या शुभेच्छा!
सुक्या बोंबिलाचे तोरण लावा दारी
तळलेली सुरमई दरवळुदे तुमच्या घरी
चिकन मटण रस्सा आणि झणझणीत मच्छि करी
करून असा हा बेत भारी
साजरी करूयात गटारी!
गटारी.. गंमत म्हणून टाईट होण्याची रीत
गटारी या सणाला अनेक मंडळीचा खाण्यासोबत मद्यपान करण्याकडे सुद्धा कल असतो, पण लक्षात घ्या आपल्या तब्यतेची काळजी घेऊन हा दिवस साजरा करणे महत्वाचे आहे, कारण तुमच्या आनंदाला गालबोट लागलेले कोणालाच आवडणार नाही, बरोबर ना?