गटारी अमावस्या । File Photo

Gatari Amavasya 2020 Date:  महाराष्ट्रामध्ये पुढील आठवड्याभरामध्ये श्रावण महिन्याला सुरूवात होणार आहे. दरम्यान श्रावण (Shravan Month)  हा हिंदुधर्मीयांसाठी अत्यंत पवित्र महिना असल्याने या काळात मांसाहार निषिद्ध असतो. त्यामुळे प्रामुख्याने कोकणासह राज्यभर श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी मांसाहारावर ताव मारण्यासाठी 'गटारी' (Gatari) साजरी केली जाते. यंदा 20 जुलै दिवशी आषाढी अमावस्या (Aashadh Amavasya)  असल्याने 19 जुलै, रविवार दिवशी गटारी म्हणजेच मांसाहारींना मासे, चिकन, मटण यांच्यावर ताव मारण्यासाठी अखेरची संधी आहे. महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे विशिष्ट वारांमध्येच मांसाहार खाण्याचा बेत केला जातो. त्यानुसार आजपासून पुढील रविवार पर्यंत मांसाहारा साठी शेवटचे आठ दिवस आहेत.

गटारीच्या निमित्ताने अनेक घरामध्ये कोंबडी वड्यांसह अनेक मांसाहाराचे प्रकार बनवले जातात. पुढील माहिनाभर पवित्र महिन्यात मांसाहारासोबतच मद्यसेवन देखील काहीजण टाळतात, त्यामुळे गटारीच्या निमित्ताने अनेक जण श्रावण महिन्याची सुरूवात होण्यापूर्वी कुटुंबासोबत, मित्रपरिवारासोबत धम्माल मस्ती करत पावसाळी वातावरणाची मज्जा लुटली जाते. अनेक जण चातुर्मास देखील पाळतात त्यामुळे श्रावण, पाठोपाठ गणेशोत्सव, नवरात्रोत्सवाचं मंगल पर्व पार पडल्यानंतर पुन्हा मांसाहार खाण्याची संधी  मिळते. Shravan Month 2020 in Maharashtra:महाराष्ट्रात श्रावण महिना 21 जुलै पासून; श्रावणी सोमवार, मंगळागौर ते महत्त्वाच्या सणांच्या पहा तारखा.

आषाढी अमावस्या वेळ आणि तारीख

यंदा आषाढी अमावस्या 19 जुलै दिवशी उत्तर रात्री 12 वाजून 10 मिनिटांनी सुरू होणार आहे तर 20 जुलै दिवशी रात्री 11 वाजून 2 मिनिटांनी संपणार आहे.

Bottle Gourd Health Benefit : दूधी भोपळ्याचे 'हे' फायदे ऐकून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल - Watch Video

आषाढी अमावस्येदिवशी महाराष्ट्रात श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी मांगल्याचं प्रतिक म्हणून दिव्याची पूजा करून दीप अमावस्या साजरी केली जाते.

(टीप: सदर लेख हा केवळ माहितीपर मजकूर देण्यासाठी लिहण्यात आलेला आहे. लेटेस्टली मराठीचा कोणत्याही अंधश्रद्धा पसरवण्याच्या, धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही.  )