Vinit Deshmukh Pune Made Aarti Robot (Photo Credits: File Image)

Ganeshotsav 2020: कोरोनाच्या काळात (Coronavirus)  उत्साह कमी होउ न देता बाप्पाचंं स्वागत देशभरात करण्यात आलंं, मात्र चिंता फक्त इथेच थांबत नाही तर बाप्पाच्या आरतीपासुन ते पुजेपर्यंत तसेच दर्शनाला येणार्‍या मंंडळींंच्या सुरक्षेचा प्रश्न सुद्धा सर्वांसमोर आहे, पुजेच्या सामग्रीतुन विषाणु पसरेल का? सॅनिटाइझर मध्ये अल्कोहोल असल्याने त्याचा वापर करणे किती सुरक्षित ठरेल अशा सर्व प्रश्नांवर पुण्याच्या (Pune) एका विद्यार्थ्याने नामी कल्पना शोधुन काढली आहे. विनित विशाल देशमुख (Vinit Deshmukh) या 11 वीत शिकणार्‍या मुलाने एक अनोखी कल्पना तंंत्रज्ञानाच्या मदतीने वास्तवात आणल्याचे समजतेय, विनितने बाप्पाच्या आरतीसाठी स्वतः एक रोबोट (Aarti Robot) बनवला आहे. या कलप्नेविषयी आम्ही प्रत्यक्ष विनीतशी बातचीत केली असता त्याने आपला हेतु आणि या रोबोटचे स्वरुप याविषयी फारच इंटरेस्टींंग माहिती दिली आहे. चला तर मग या आरती करणार्‍या रोबोट विषयी आणखीन जाणुन घेउयात..

Nagpur Hilltop Cha Raja: नागपुर मध्ये डॉक्टर च्या रुपात अवतरले बाप्पा, हिलटॉप चा राजा चे सुंंदर फोटो इथे पाहा

विनीत सांगतो की, कोरोना च्या पार्श्वभूमीवर हा आरती रोबोट तयार केला आहे.यामागे दोन मुख्य उद्देश आहेत तर एक म्हणजे आरती ला जाताना सॅनिटायझर वापरणे धोक्याचे ठरु शकते कारण आरतीच्या वेळी पेटती आग व सॅनिटायझर मधील अल्कोहोल याचा भडका उडु शकतो, मात्र या रोबोटमुळे ही चिंंता दुर होते. हा रोबोट आरती करतो घंटी वाजवतो टाळ वाजवतो आणि ताशा देखील वाजवतो. दुसरा मुद्दा म्हणजे अपंगांना यामूळे मदत होते.

विनित देशमुख ने बनवलेला आरती रोबोट

विनित ने हा रोबोट प्रोग्रामिंग करुन तयार केला आहे .ज्या मध्ये atmega8 प्रोग्रम्मिंग बोर्ड वापरला आहे.या रोबोटचा मूळ ढाचा स्टीलचा आहे मी C++ प्रोग्रामिंग लॅंगवेज वापरली आहे.

आरती रोबोट

Vinit Deshmukh Pune Made Aarti Robot (Photo Credits: File Image)

दरम्यान विनित हा इयत्ता तिसरीपासुन रोबोटीक्स मधील आपली आवड जपत आहे, यावेळी गणेशोत्सवाची परिस्थिती पाहता त्याने आपली ही आवड अत्यंत कार्यक्षम रित्या वापरात आणली आहे.