Ganeshotsav 2020: सावधान! सॅनिटाइझर लावून गणपतीच्या आरतीला जाताय? मग हे नक्की वाचा
Hand Sanitisers | Image For Representational Purpose (Photo Credits: Pixabay)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हात स्वच्छ करण्यासाठी साबणासह सॅनिटाइझरचा (Sanitizer) मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे. एवढेच नव्हेतर, अनेकजण त्यांच्यासोबत सॅनिटाइझरची एक बाटली नेहमी आपल्या सोबत ठेवतात. यामुळे अशा लोकांसाठी एक महत्वाची माहिती आहे. संपूर्ण देशात आज गणेशाचे आगमन झाले आहे. गणेशाची आरती झाल्यानंतर सर्वाधिक प्राधान्याने आरती घेतली जात असते. मात्र, हाताला सॅनिटाइझर लावून आरती घेणे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. कारण, सॅनिटाइझरमध्ये असलेल्या अल्कोहोमुळे तुमचा हात भाजण्याची शक्यता आहे. यामुळे आरतीला जाण्यापूर्वी आपले साबणाने स्वच्छ धुणे गरजेचे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सॅनिटाइझरमध्ये 60- 75 टक्के इथनोल, अल्कोहोल, 15 टक्के, ग्लिसरीन, एक ते पाच टक्के प्रोपिलीन ग्लायकोल, ट्राईइथलोमाईन, पाणी, सुवासिरक रंग, यांचे मिश्रण असते. इथनोल आणि अल्कोहोल दोन्हीही ज्वलनशील असून सॅनिटाइझरमध्ये तो अधिक प्रमाणात असतो. तसेच हर्बल सॅनिटाइझरमध्येही अल्कोहोचा वापर केलेला असतो. अल्कोहोलयुक्त पदार्थ आगीजवळ नेल्यास तो पटकन पेट घेतो. यामुळे हाताला सॅनिटाइझर लावलेले असताना अधिक सावधानी बाळगणे अधिक गरजेचे आहे. हे देखील वाचा- मुंबई: घाटकोपर येथील मुर्तिकार यांनी गणेश चतुर्थीनिमित्त साकारली 'Sanitizer Ganesha' ची मुर्ती, पहा फोटो

जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार सॅनिटाइझरचा स्प्रेचा अधिक वापर केल्याने त्वचा कोरडी पडते. तसेच स्प्रेमधील कण नाकात- डोळ्यात गेल्यास त्यातील तीव्र अल्कोहोलमुळे त्रास होण्याचीदेखील शक्यता वर्तवण्यात येते. त्यामुळे अशा सॅनिटाइझर स्प्रेचा वापर करीत असाल तर, सावध रहा, असा सल्लाही तज्ज्ञांनी दिला होता.