मुंबई: घाटकोपर येथील मुर्तिकार यांनी गणेश चतुर्थीनिमित्त साकारली 'Sanitizer Ganesha' ची मुर्ती, पहा फोटो
Sanitizer Ganesha Idols (Photo Credits-ANI)

देशभरासह महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा (Ganeshotsav) सण येत्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे पण यंदा गणेशोत्सवाची दरवर्षीप्रमाणे धूम दिसून येत नाही. कारण गणेशोत्सावर कोरोना व्हायरसचे सावट असल्याने मोठ्या थाटामाटात हा सण साजरा करता येणार नाही आहे. याच दरम्यान कोरोना व्हायरसमुळे अनेक मुर्तिकारांना सुद्धा फटका बसला आहे. परंतु मुंबईतील घाटकोपर (Ghatkopar) येथील एका मुर्तिकाराने गणेश चतुर्थीनिमित्त 'सॅनिटायझर गणेशाची' (Sanitizer Ganesha) मुर्ती साकारली आहे.

मुर्तिकाराने याबद्दल अधिक माहिती देत असे म्हटले आहे की, सॅनिटायझर वितरित अशी गणेशाची मुर्ती साकारली आहे. त्यामुळे जेव्हा लोक बाप्पाच्या पायाला हात लावतील त्यावेळी त्यांचे हात आपोआपच सॅनिटायइज केले जाणार आहेत. या मुर्तिकाराने साकारलेली ही गणेशाची मुर्ती खरोखरच सध्याच्या कोरोनाच्या काळात पर्यावरणपुरक आणि अनोख्या पद्धतीची आहे.(Ganeshotsav 2020: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव सामाजिक भान राखत शांततेने साजरा करावा; महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन) 

मुंबई सह महाराष्ट्रामध्ये यंदा कोरोना संकटामुळे कंटेन्मेंट झोन मध्ये असणार्‍या भागातील नागरिकांना गणेशोत्सवाच्या काळातही ये-जा करता येणार नाही. त्यांच्यासाठी विसर्जनाची सोय देखील त्यांच्यांच भागात फिरत्या कृत्रिम तलावांच्या मदतीने केली जाणार आहे. मग यंदा गणेशोत्सवानिमित्त मित्र मैत्रिणींपासून ते अगदी घरातील नातलगांकडेही जाण्याचा हट्ट थोडा कमी करा आणि व्हर्च्युअली जगात गणरायाचं दर्शन घेऊन कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करायला प्रशासनाला, आरोग्य यंत्रणांना मदत करा.