Ganeshotsav 2020: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव सामाजिक भान राखत शांततेने साजरा करावा; महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

कोरोना संकटामुळे यावर्षी सार्वजनिक गणेश मंडळांसाठी गणपतीची मूर्ती 4 फुटांची तर, घरगुती गणेश मुर्ती 2 फुटांची असावी, असे या मार्गदर्शक सुचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Ganeshotsav 2020: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव सामाजिक भान राखत शांततेने साजरा करावा; महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन
Chief Minister Uddhav Thackeray's (PC - Twitter)

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशातील अनेक धार्मिक, समाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम रद्द किंवा निर्बंधांखाली साजरा करावे लागले आहे. याच पार्श्वभूमीवर यावर्षीचा गणेशोत्सव (Ganeshotsav 2020) सामाजिक भान राखत शांततेने साजरा करण्यात यावा, असे आवाहन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी केले आहे. तसेच याकाळात गर्दी होणार नाही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घ्यावी. कोरोना युद्धाच्या मध्यावर आपण काही ठिकाणी शिखराकडे गेलो तर काही ठिकाणी जात आहोत त्यामुळे गाफील न राहता आतापर्यंत ज्या उपाययोजना सुरू आहेत त्या यापुढेही नेटाने राबवाव्यात, असे निर्देश उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले आहेत.

उद्धव ठाकरे यांनी गणेशोत्सवासह राज्यातील कोरोना उपाययोजनांचा आढवा घेतला आहे. यावेळी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगर पालिका आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, गृह मंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव संजय कुमार, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, राज्य टास्क फोर्सचे सदस्य सहभागी झाले होते. हे देखील वाचा- महाराष्ट्रात 20 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2020 दरम्यान साजरा होणार 'सामाजिक ऐक्य पंधरवडा'; हिंसाचार टाळून विविध धर्माच्या लोकांमध्ये ऐक्य निर्माण करण्याचा उद्देश

ट्वीट

कोरोना संकटामुळे यावर्षी सार्वजनिक गणेश मंडळांसाठी गणपतीची मूर्ती 4 फुटांची तर, घरगुती गणेश मुर्ती 2 फुटांची असावी, असे या मार्गदर्शक सुचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्याचे पालन करतानाच आगमन आणि विसर्जन मिरवणूका निघणार नाहीत, गणेशोत्सवात गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, याची दक्षता घेणे अत्यावश्यक असून गृह विभागाचे परिपत्रक सर्व संबंधितांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

(The above story first appeared on LatestLY on Aug 18, 2020 06:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).