Ganeshotsav 2020: देशात कोरोनाचा (Coronavirus) हाहाकार सुरु असताना डॉक्टर आणि पोलिस कर्मचारी हे स्वतःच्या जीवावर उदार होउन देशवासियांची सेवा करत आहेत. या कोरोनाच्या संकटामुळे यंंदा गणेशोत्सवाचा मोठा सोहळा सुद्धा रद्द झाला आहे, पण संकटातही उत्साह कमी होउ न देणे हे जणु काही भारतीयांची खुबी आहे, त्यामुळे या ना त्या प्रकारे का होईना देशात साधेपणाने गत विकेंंडपासुन गणपती बाप्पांचे आगमन झाले आहे. इतकंच काय तर यंंदा अनेकांनी कोरोनालाच आपली गणपती थीम बनवुन सजावट केली आहे. असाच एक कोरोना थीम चा बाप्पा सुद्धा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे, नागपुर (Nagpur) मधील हिलटॉपचा राजा (Hilltop Cha Raja) म्हणुन ओळखल्या जाणार्या बाप्पाची मुर्ती यंंदा डॉक्टरांच्या वेषात तयार करण्यात आली आहे. या डॉक्टर बाप्पाचे काही सुंंदर फोटो ANI या वृत्त संस्थेने शेअर केले आहेत, ज्यावर गणेश भक्तांनी खुपच पॉझिटिव्ह प्रतिक्रिया दिल्या आहेत.
नागपूरमधील हिलटॉपचा राजा नावाने ओखल्या जाणाऱ्या एकता गणेशोत्सव मित्र मंडळाने करोना रुग्णालयाचा देखावा यंदा साकारला आहे.चार फुट उंंचीचे गपणती बाप्पा हे डॉक्टर्सचा कोट घालून, हातात स्टेथस्कोप घेऊन उभे आहेत. बाप्पांच्या बाजूला कोवीड योद्धे आरोग्य कर्मचारी आणि पोलीस दिसत आहेत.
हिलटॉप चा राजा डॉक्टर बाप्पाचे फोटो, (फोटो सौजन्य- ANI)
दरम्यान मागील काळात डॉक्टर व वैद्यकीय क्षेत्रातील मंंडळी ही खरोखरच देवाच्या रुपात नागरिकांच्या मदतीला रुजु झाली आहेत. त्यामुळे अशा माध्यमातुन त्या सर्व देवमाणसांंना केलेला सलाम स्तुत्य आहे.