Dagdusheth Halwai Ganpati (Photo Credits: Wikipedia)

गणेशोत्सवाला (Ganeshotsav) अवघे तीन दिवस बाकी आहेत. सोमवार, 2 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीला (Ganesh Chaturthi) गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाईल. सध्या गणपतीच्या मुर्त्यांवरून शेवटचा हात फिरवला जात आहे, तर दुसरीकडे भक्तांची तयारीसाठी बाजारपेठेत झुंबड उडाली आहे. गणपतीच्या साग्रसंगीत पूजेच्या अनेक गोष्टी बाजारात उपलब्ध आहे. त्यात सर्वात महत्वाचे आहे ते म्हणजे बाप्पाला वाहिल्या जाणाऱ्या पत्री, म्हणजेच विविध वृक्षांची पाने. गणपतीला 20 झाडांची 20 पणे अतिशय प्रिय आहेत. बाप्पाची या पानांसह पूजा केल्यास नक्कीच त्याचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील.

यामध्ये प्रत्येक पानांचा रंग आणि आकार वेगळा आहे. प्रत्येकाचा गंध वेगळा आहे. हे गंध काही ग्रहांशी निगडीत आहेत. ही पाने श्रीगणेशाला वेगवेगळ्या मंत्रांनी अर्पण केली जातात. तर या गणेशोत्सवावेळी ही पाने गणपतीला अर्पण केल्यास तुम्हाला अपेक्षित फळ नक्कीच मिळेल.

शमी पत्र - 'ॐ सुमुखाय नम:'

बेलपत्र – ‘ॐ उमापुत्राय नम:'

दूर्वा – ‘ॐ गजमुखाय नम:'

बोराचे पान – ‘ॐ लंबोदराय नम:'

धोतर्‍याचे पान – ‘ॐ हरसूनवे नम:'

सेम वृक्षाचे पान अर्पण करताना – ‘ॐ वक्रतुंडाय नम:'

तेजपान – ‘ॐ चतुर्होत्रे नम:'

कन्हेर पान - ‘ॐ विकटाय नम:'

केळीचे पान - ‘ॐ हेमतुंडाय नम:'

आकचे पान - ‘ॐ विनायकाय नम:'

(हेही वाचा: आपल्या राशीनुसार निवडा गणपतीच्या मूर्तीचे रंग; घरात नांदेल सुख समाधान व राहील बाप्पाचा आशीर्वाद)

अर्जुनाचे पान अर्पित करताना - ‘ॐ कपिलाय नम:'

महुआचे पान अर्पित करताना - ‘ॐ भालचन्द्राय नम:'

अगस्त्य वृक्षाचे पान - ‘ॐ सर्वेश्वराय नम:'

वनभंटा – ‘ॐ एकदंताय नम:'

भृंगराजचे पान ‘ॐ गणाधीशाय नम:'

आगाड़्याचे पान – ‘ॐ गुहाग्रजाय नम:'

देवदाराचे पान – ‘ॐ वटवे नम:'

गांधारी वृक्षाचे पान – ‘ॐ सुराग्रजाय नम:'

शेंदुराच्या वृक्षाचे पान - ॐ हेरम्बाय नम:'

केतकीचे पान – ‘ॐ सिद्धिविनायकाय नम:'

सगळ्यात शेवटी दोन दूर्वा दल, गंध, फुले आणि अक्षता गणपतीला अर्पित कराव्या. मात्र लक्षात ठेवा गणपतीला तुळस वाहिली जात नाही. ‘माझ्या कोणत्याही पूजेअर्चेवेळी, कोणत्याही शुभ विधीत तुझा वापर होणार नाही’ असा श्राप गणपतीने तुळशीला दिला आहे.