Ganesh Chaturthi 2024 Invitation Card in Marathi: भगवान महादेव आणि माता पार्वतीचा लाडका पुत्र भगवान गणेशाचा जन्मोत्सव गणेश चतुर्थीचा सण म्हणून मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. असे मानले जाते की, हिंदू कॅलेंडरनुसार, भगवान गणेशाचा जन्म भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला झाला होता, म्हणून त्यांची जयंती गणेश चतुर्थी म्हणून साजरी केली जाते. यावर्षी गणेश चतुर्थी 7 सप्टेंबर 2024 रोजी साजरी केली जात आहे आणि या दिवसापासून दहा दिवसांचा गणेशोत्सव देखील सुरू होत आहे, ज्याची सांगता 17 सप्टेंबर 2024 रोजी अनंत चतुर्दशीला होईल. दरम्यान, बाप्पाला घरी आणल्यानंतर सर्वांना आमंत्रित केले जाते. घरी आणल्यानंतर त्यांची भक्ती भावाने पूजा केली जाते. गणेशोत्सवाचे 10 दिवस भक्त आपल्या लाडक्या बाप्पासाठी विविध देखावे तयार करतात, दरम्यान, तुम्ही तुमच्या प्रिय जणांना घरी बाप्पाच्या आरतीला आमंत्रित करू इच्छित असाल तर आम्ही तुमच्या साठी खास आमंत्रण पत्रिका घेऊन आलो आहोत, खाली दिलेली आमंत्रण पत्रिका पाठवून तुम्ही तुमच्या प्रियजनांना घरी आमंत्रित करू शकता. चला तर मग पाहूया.. हे देखील वाचा: Bail Pola 2024: यंदा बैलपोळा कोणत्या तारखेला? जाणून घ्या, महत्व, पूजा विधीसह संपूर्ण माहिती
गणेशोत्सवासाठी खास आमंत्रण पत्रिका,पाहा
गणेशोत्सवाबाबत असे म्हटले जाते की, गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा आपल्या भक्तांमध्ये सर्व अडथळे दूर करून आपल्या मनोकामना पूर्ण करतात, त्यानंतर दहा दिवसांनी अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पा पुन्हा कैलासात परततात. गणपतीला आद्य देवता मानले जाते, त्यामुळे कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी त्यांची पूजा केली जाते. या तारखेला त्यांचा जन्म झाला असे मानले जाते, म्हणून ती गणेश चतुर्थी म्हणून साजरी केली जाते.