Ganesh Chaturthi 2020 Rangoli Designs: गणेशोत्सवाचा सण अखेर उद्यापासून (22 ऑगस्ट) सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे. यंदा कोरोना व्हायरसमुळे मोठ्या प्रमाणात गणेशोत्सवाची धुम जरी दिसणार नसली तरीही घरोघरी बाप्पाच्या आगमानासाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे. बाप्पासाठी आकर्षक डेकोरेशन, त्यासाठी नैवेद्य आणि बऱ्याच काही गोष्टींबद्दल लोक फार उत्सुक असून आता सर्वजण सण साजरा करण्यासाठी आनंदित दिसून येत आहेत. बाप्पाच्या आगमापूर्वी ते विसर्जनापर्यंत घरासमोर किंवा मंडपाच्या समोर सुबक आणि आकर्षक अशी रांगोळी काढली जाते. त्यामुळे एखादा व्यक्ती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी येण्यापूर्वी त्याचे लक्ष उंबरठ्याच्या येथे काढण्यात आलेल्या रांगोळीकडे नक्कीच जाते.(Ganesh Chaturthi 2020 Modak Recipes: गणेश चतुर्थी निमित्त डबलडेकरपासून फुलांच्या पाकळ्यांच्या आकाराचे उकडीचे मोदक यंदा नक्की ट्राय करा)
तर यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त सोप्पी आणि सुंदर अशी रांगोळी काढून तुम्ही सण साजरा करु शकणार आहेत. तसेच बाप्पासह घरी येणाऱ्या प्रत्येकाला तुमच्या रांगोळीमुळे प्रसन्न वाटेल. तर पहा या काही गणेशोत्सवानिमित्त रांगोळी डिझाइन्स(Ganesh Chaturthi 2020 Messages: गणेश चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, Images च्या माध्यमातून शेअर करुन साजरा करा यंदाचा गणेशोत्सव!)
दरम्यान यंदा कमीत कमी लोकांमध्ये, घरच्या घरी आणि साधेपणाने गणेशोत्सव साजरा करा असे आवाहन प्रशासनाकडून गणेशभक्तांना करण्यात आले आहे. गणेशमूर्तीची कमाल उंची 4 फूट असेल. तर यंदा मिरवणूका, आगमन, विसर्जन सोहळा, धामधूम नसेल.