Easy Modak Recipe in Marathi: वर्षभरापासून गणेश भक्त ज्या सणाची आतुरतेने वाट पाहत असतो तो सण म्हणजे गणेश चतुर्थी.. ज्या दिवशी गणपती बाप्पा काही दिवसांचे पाहुणे म्हणून आपल्या घरी विराजमान होतात. त्यांचा छान पाहुणचार करण्यासाठी गणेश चतुर्थी शिवाय दुसरा सुवर्ण योग कोणता म्हणायचा. काही दिवसांसाठी आपल्या घरी आलेल्या या पाहुण्याचे आदरातिथ्य करण्यात काही कमी पडू नये म्हणून छान पंचपक्वान्नांचा बेत केला जातो. गणेशाला या पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखवला जातो. मात्र हा नैवेद्य गणेशाच्या आवडीच्या उकडीच्या मोदकांशिवाय (Modak)अधूरा आहे. यंदा गणेशाला मोदकाच्या माध्यमातून काही वेगवेगळ्या आकाराचे मोदक बनवून खूश करू शकता. अथवा आपल्या घरातील लोकांनाही ते खाऊ घालू शकता.
छान नाजूक पा-यांच्या मोदकासोबत डबल डेकर मोदक, फुलांच्या पाकळ्यांच्या आकाराचे मोदक, गुलाबाच्या आकाराचे मोदकही तुम्ही यंदा ट्राय करु शकता.
पाहा रेसिपीज
काय मग कशी वाटली ही हटके आयडिया. यंदा गणेश चतुर्थीला नेहमीपेक्षा काहीतरी हटके करण्याची इच्छा असेल तर त्याची सुरुवात मोदकांपासून करायला काही हरकत नाही. गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!