Ganesha Whatsapp Stickers (Photo Credtits: Google Play Store)

Ganesh Chaturthi 2020: येत्या विकेंड पासुन गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) रुपात 10 दिवसांचा मोठा सोहळा सुरु होणार आहे. 22 ऑगस्ट रोजी घरोघरी बाप्पांचं आगमन होईल. यंंदा कोरोनामुळे सणाचे स्वरुप साधे ठेवणे अनिवार्य करण्यात आले असले तरी उत्साह कुठेही कमी होउ द्यायची गरज नाही. ऑनलाईन सेलिब्रेशन च्या माध्यमातुन आपण आपल्या दुर राहणार्‍या मित्र मंंडळींना, नातेवाईकांंना, कुटुंबियांना, प्रियजनांंना शुभेच्छा देउन गणेशोत्सवाचा आनंद साजरा करु शकता. या शुभेच्छा सुद्धा हटके अंदाजात देण्यासाठी Ganesha Whatsapp Stickers चा वापर करु शकता. ऐनवेळी घाई होण्यापेक्षा आता वेळ आहे तेव्हाच हे स्टिकर्स डाउनलोड करुन ठेवा म्हणजे 22 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीला तुम्हाला एका क्लिकवर शुभेच्छा पाठवता येतील. गूगल प्ले स्टोअर वरुन हे गणेशोत्सव विशेष व्हॉटसअ‍ॅप स्टिकर्स कसे डाउनलोड करायचे हे खाली दिलेल्या सोप्प्या स्टेप्स मधुन जाणुन घ्या. Ganesh Chaturthi 2020 E-Invitation Cards For Virtual Celebrations

How To Download Ganesha Whatsapp Stickers

-WhatsApp ओपन करा त्यानंतर एखाद्या व्यक्तीच्या चॅट विंडोमध्ये जा.

-खालच्या बाजूला तुम्हाला इमोटीकॉन्सच्या बाजूला व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर्सचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.

-उजव्या कोपऱ्यात + साईनवर क्लिक करा.

-सर्वात खाली Get More Stickers चा पर्याय दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हांला गुगल प्ले स्टोअरची लिंक ओपन झालेली दिसेल.

-त्यानंतर Ganesha Whatsapp Stickers असं सर्च करा.

-तुम्हांला आवडेल ते स्टिकर्स पॅक निवडा आणि Add To whatsapp वर क्लिक करा. तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप मध्ये स्टिकर्स आले असतील.

यंदा गणेशोत्सवाच्या दरम्यान सार्वजनिक स्तरावर मंंडळांंनी केवळ परंपरेपुरतेच सेलिब्रेशन करण्याचे ठरवले आहे. मात्र घरात तुम्ही बाप्पाची पुजा अर्चना अगदी रीतसर पणे मनोभावे करु शकता. बाप्पाच्या दर्शनाला आजुबाजुच्या शेजार्‍यांना बोलावत असाल तर आवश्यक ती काळजी घ्या. गणेशोत्सवाच्या Advance मध्येच खुप खुप शुभेच्छा!