Ganesh Jayanti | Photo Credits: Instagram

Ganesh Chaturthi 2020: कोरोना संकट काळात देशातील धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणारा गणोशोत्सव यावर्षी अतिशय साध्या पद्धतीने पार पडणार आहे. गणोशोत्सवाला केवळ आठवडा शिल्लक राहिला आहे. येत्या 22 सप्टेंबर रोजी श्रीगणेश आगमन होणार आहे. या दिवशी अनेकजण आपल्या घरात गणेशमूर्तीची स्थापना करून पुढील 10 दिवस पूजा करतील. मात्र, यावर्षी समाजिक अंतराचे पालन करून गणोशोत्सव साजरा केला जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या नातेवाईकांना आणि जवळच्या लोकांना व्हिडिओ कॉल किंवा झूम मीटिंगद्वारे आरतीमध्ये सहभागी करू शकतात. यातच त्यांना आमंत्रित करण्यासाठी खालील इमेज उपयोगी ठरणार आहेत.

लॉकडाऊनच्या निर्बंधांसह यावर्षी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाचे आगमन सार्वजनिक मंडळांसह अनेक घरांमध्येही होणार आहे. घरगुती गणेशोत्सव किमान दीड दिवस ते 5, 7, 10 दिवस साजरा केला जातो. काही घरात गणपतींसोबतच गौरी आवाहनाचादेखील सोहळा रंगतो. तुमच्या मित्रमंडळांसोबत, घरातील नातेवाईकांना, सहकार्‍यांना आमंत्रित करण्यासाठी आकर्षक आमंत्रण पत्रिका खाली देण्यात आली आहे. हे देखील वाचा- Eco Friendly Ganpati Decoration Ideas: गणपती बाप्पाला विराजमान करण्यासाठी आकर्षक आणि पर्यावरणपूरक सजावट, मखर कसा बनवाल? (Watch Video)

निमंत्रणपत्रिका- 

निमंत्रणपत्रिका-

 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी गणेशोत्सव इको फ्रेंडली स्वरूपात साजरा करण्याकडे अनेक भाविकांचा भर आहे. त्यामुळे आमंत्रितांनाही त्याचे भान ठेवून गणपतीसाठी फळे, फुले आणि इतर प्रसादाचे साहित्य आणण्याचे भान ठेवण्याचे आवाहन करायला विसरू नका.