Ganeshotsav 2020 | Photo Credits: Pixabay.com and Instagram

यंदाचा गणेशोत्सव अवघ्या आठवड्याभरावर येऊन ठेपला आहे. 22 ऑगस्ट दिवशी यंदा सर्वत्र भाद्रपद गणेश चतुर्थी साजरी केली जाणार आहे. या दिवशी घराघरामध्ये गणेश मूर्तीची स्थापना करून प्राण प्रतिष्ठा केली जाते. दरम्यान गणेशोत्सवात गणेश आणि गौरीच्या आगमनानिमित्त खास आरास केली जाते. त्याची तयारी घराघरांमध्ये सुरू झाली आहे. मग यंदा कोरोना संकटकाळात बाजारात मखर विकत घेण्यासाठी जाण्यापेक्षा घरच्या घरीच आकर्षक सजावट करण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मग तुम्ही देखील कोरोना संकटकाळात सुरक्षित आणि पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्याचा विचार करत असाल तर पहा किती आकर्षक स्वरूपात यंदा तुम्ही गणोत्सवासाठी सजावट करू शकाल?

कागदापासून आकर्षक ओरोगामीच्या सजावटीपासून ते कपड्यांच्या वापर करून देखील घरच्या घरी गणपती बाप्प्पाला विराजमान करण्यासाठी आकर्षक मखर बनवू शकता. पहा त्याचे काही इको फ्रेंडली पर्याय

कागदांचा वापर 

झटपट डेकोरेशन

इको फ्रेंडली डेकोरेशन

आकर्षक डेकोरेशन

DIY Decoration Ideas

दरम्यान यंदा गणपती बाप्पा 22 ऑगस्ट दिवशी विराजमान होणार आहे. तर गौरीचं आगमन 25 ऑगस्ट दिवशी केले जाणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा सार्वजनिक गणेशोत्सवाची धूम नसेल. कोरोना संकटात नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी असे आवाहन करण्यात आले आहे.