
Ganesh Chaturthi 2020 Images: आज सर्वत्र गणेश चतुर्थी साजरी केली जात आहे. आज सर्वत्र घरगुती गणेशोत्सव तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाची तयार सुरू आहे. गणेशाचा जन्म भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षात झाला होता. त्यामुळे या मुहूर्तावर गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली जाते. गणेश चतुर्थीचा हा उत्सव अनंत चतुर्दशीपर्यंत म्हणजे साधारण 10 दिवस साजरा केला जातो. यंदा अनंत चतुर्दशी ही 1 सप्टेंबरला असणार आहे. त्यामुळे यंदा हा उत्सव 11 दिवस चालणार आहे.
यंदा कोरोना संकटामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याच्या सुचना सरकारने दिल्या आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर गणेशोत्सवानिमित्त गणेश भक्तांना शुभेच्छा देण्यासाठी खालील मराठी HD Wallpapers, WhatsApp Status तुमच्या नक्की उपयोगात येतील. (हेही वाचा - Ganesh Chaturthi 2020 Rangoli Designs: गणेशोत्सवानिमित्त घरासमोर 'या' काही सोप्प्या आणि आकर्षक रांगोळी काढून करा सण साजरा)
गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

तुम्हाला व तुमच्या परिवाराला गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा!

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ:।
निर्विघ्नं कुरु मे देव: सर्वकार्येषु सर्वदा॥
गणेशोत्सवाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

जीव जडला चरणी तुझिया
आधी वंदू तुज मोरया
गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

संपूर्ण देशात गणेशोत्सव मोठ्या उत्सहात साजरा केला जातो. पेशव्यांच्या काळापासून गणेशोत्सव घरगुती उत्सवाच्या स्वरूपात साजरा करत असल्याचे उल्लेख आहेत. लोकमान्य टिळकांनी ब्रिटीशांच्या काळात समाजातील एकी वाढण्याकरिता हा उत्सव साजरा करण्यास सुरूवात केली. भारतासोबतच विदेशातही गणेश चतुर्थी आणि गणेशोत्सव साजरा केला जातो. भारतातून गणपतीच्या मूर्ती विदेशात पाठवल्या जातात. तेथे बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून गणेश चतुर्थी पारंपारिकरित्या उत्साहात साजरी केली जाते.