Ganpati Bappa (Photo Credits: Facebook)

गणेश चतुर्थी अगदी उद्यावर येऊन ठेपली आहे. 22 ऑगस्ट, शनिवार भारतभर आणि भारताबाहेरही श्री गणरायाचे आगमन होईल. संपूर्ण वर्षभर गणेशभक्त गणेशोत्सवाची अगदी आवर्जुन वाट पाहतात. घरोघरी गणपती बाप्पा विराजमान होतात. गणेश मंडळात गणरायाचे आगमन होते. त्यानंतर गणेशाची पूजा-प्रार्थना आणि आरती केली जाते. गणपती बाप्पाच्या आरती शिवाय अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते. गावी तर प्रत्येक घरात आरतीसाठी मंडळी जमतात. आरतीसाठी एकत्र जमणे आणि सर्वांनी एकत्र आरती म्हणणे हा एक सोहळा असतो. ती भावनाच अत्यंत सुखद आणि उत्साहवर्धक असते. परंतु, शहारात साधारणपणे मोजकीच माणसं आरतीला उपस्थित असतात. अशावेळी Ganpati Aarti Audio, Video तुम्हाला आरतीसाठी अनेक लोकं उपस्थित असतील, असा भास निर्माण करतील.

आरतीतून गणपती बाप्पा बद्दलचे प्रेम, भावना आणि भक्ती व्यक्त केली जाते. त्यामुळे गणपती बाप्पाच्या काही खास आरत्या आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. हे Audio, video प्ले करुन तुम्ही आरतीचा आनंद नक्कीच घेऊ शकता. किंवा गणरायाची आरती करताना देखील तुम्हाला याचा नक्कीच उपयोग होईल. (श्रीगणेशाच्या पूजेसाठी आवश्यक लागणारी साहित्य कोणती? येथे पाहा संपूर्ण यादी)

गणपती आरती:

सुखकर्ता दु:ख हरता (Sukhkarta Dukh Harta)

जय गणेश जय गणेश देवा (Jai Ganesh Jai Ganesh Deva)

सिद्धिविनायक आरती (Siddhivinayak Aarti)

श्रीमंत दगडूशेठ आरती (Shrimant Dagdusheth Ganpati)

लालबाग चा राजा आरती (Lalbaug Cha Raja)

यंदा गणेशोत्सवावर कोरोना व्हायरसचे सावट आहे. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे गणेशोत्सवाचा जल्लोष करता येणार नाही. परंतु, साधेपणातही आनंद आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव अगदी साधेपणाने साजरा करा. कोरोनाचे संकट दूर व्हावे हीच गणरायाचरणी प्रार्थना! तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!