राष्ट्रपीता महात्मा गांधी ( Mahatma Mohandas Karamchand Gandhi). भारतीय स्वातंत्र्य लढा आणि भारताच्या आधुनिक इतिहासातील एक महत्वाचे व्यक्तिमत्व. याच व्यक्तिमत्वाची आज (2 ऑक्टोबर) जयंती. महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी केलेल्या अतुलनीय कामगिरीमुळेच त्यांना केवळ देशातच नव्हे तर अवघ्या जगभर प्रचंड आदर आणि सन्मान दिला जातो. त्यांना बापू नावानेही ओळखले जाते. देशभरामध्ये त्यांची जयंती एखाद्या सण, उत्सवाप्रमाणे त्यांचे चाहते, अनुयायी आणि अभ्यासक साजरी करतात.त्यांच्या जयंतीनिमित्त Wishes, WhatsApp Status, Quotes, शेअर करून डिजिटल माध्यमांतून आपण आपल्या भावाना, शुभेच्छा (Happy Gandhi Jayanti 2022) एकमेकांपर्यंत पोहोचवू शकतात.
महात्मा गांधी यांचा जन्म आजच्याच दिवशी म्हणजेच 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातच्या पोरबंदर येथे झाला. महात्म गांधी सत्य (Truth) आणि अहिंसा (Non-Violence) या तत्त्वांचे खंबीर पुरस्कर्ते होते. त्यांनीच आपल्याला स्वदेशी कलेची कदर करायला शिकवले. महात्मा गांधी यांनी जीवनात साधेपणाचे आचरण करून संपूर्ण जगात स्वतःचे नाव कमावले.
बापू म्हणून प्रेमाने संबोधले जाणारे, महात्मा गांधी हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे नेते होते. त्यांचा जन्मदिवस जगभरातील भारतीयांसाठी त्यांच्या शिकवणी, विशेषतः अहिंसा आणि निःस्वार्थ सेवेच्या मूल्यांवर चिंतन करण्याची संधी आहे. 2 ऑक्टोबर हा भारताचे राष्ट्रपिता, मोहनदास करमचंद गांधी किंवा महात्मा गांधी यांचा जन्म दिवस म्हणून ओळखला जातो. ज्यांनी आपल्या देशाला ब्रिटनच्या वसाहतवादी राजवटीतून मुक्त करण्यासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले.
महात्मा गांधी यांचे विचार
महात्मा गांधी यांच्या विचारांमध्ये स्पष्टता होती. ते म्हणत तुम्हाला जर लढा द्यायचा असेल तर लक्षात ठेवा. प्रथम ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतात, मग ते तुमच्यावर हसतात, मग ते तुमच्याशी लढतात, मग तुम्ही जिंकता. उद्या मरणार असल्यासारखे आज जगा आणि असे शिका की तुम्ही कायमचे जगणार आहात.
आपले विचार व्यक्त करताना गांधी पुढे म्हणतात, तुम्हाला जगात दिसणारा बदल तुम्हीच असला पाहिजे. स्वतःला शोधण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे इतरांच्या सेवेत स्वतःला गमावणे. सामर्थ्य शारीरिक क्षमतेने येत नाही. ते अदम्य इच्छाशक्तीतून येते. दुर्बल कधीही माफ करू शकत नाही. क्षमा हा बलवानांचा गुणधर्म आहे. त्यांच्या ध्येयावरील अतुलनीय विश्वासाने निश्चयी आत्म्यांचा एक छोटासा भाग इतिहासाचा मार्ग बदलू शकतो, असे महात्मा गांधी नेहमी आपले विचार स्पष्टपणे मांडत असत.