Friendship Day 2019 Quotes & Messages: आई-मुलगी, भाऊ-बहिण, बहिणी-बहिणी, आजी-नात, वडील-मुलगा, नाते कोणतेही असो. प्रत्येक नात्यात मैत्रीही असतेच. त्याचबरोबर शाळा-कॉलेज आणि त्यानंतर ऑफिस किंवा इतर ठिकाणी आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर नवे मित्र भेटतच असतात. मैत्रीशिवाय कोणतेही नाते फुलणे शक्य नाही. हा मैत्रीचा भाव मनातून यावा लागतो. त्यामुळे रक्ताचे नसले तरी मैत्रीच्या नात्याला विशेष महत्त्व आहे. यारी-दोस्तीच्या या नात्याचा उत्सव ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. त्यास 'फ्रेंडशिप डे' (Friendship Day) असे म्हणतात. यंदा 4 ऑगस्ट (रविवार) मैत्रीचा हा उत्सव सगळीकडे अगदी उत्साहात साजरा केला जाईल. Friendship Day 2019: मराठी कलाकारांच्या मैत्रीची ही 5 'त्रिकुटं' आहेत ऑल टाइम हिट (See Photos)
मैत्रीत प्रेम, आपुलकी, काळजी, जिव्हाळा, राग, रुसवा, भांडण सारं काही असतं. अशा या विविधढंगी नात्याचे महत्त्व शब्दांत व्यक्त करणे कठीणच. पण काही महान व्यक्तींनी ही किमया अगदी लिलया साधली आहे. फ्रेंडशिप डे निमित्त जाणून घेऊया अशाच काही महान व्यक्तींचे खास विचार. हे खास विचार आपल्या मित्रमैत्रिणींसोबत Facebook, WhatsApp च्या माध्यमातून शेअर करुन त्यांचा दिवस स्पेशल करा. (Friendship Day 2019 Gift Ideas: तुमच्या हटके मित्रांसाठी 10 हटके गिफ्ट आयडियाज)
मैत्रीची परीक्षा संकटात केलेल्या मदतीने होते आणि ती मदत बिनशर्त असणे आवश्यक आहे. - महात्मा गांधी
जो टिका करतो. परंतु मैत्री तुटण्याच्या भीतीने सावध राहतो, तो मित्र नाही. - गौतम बुद्ध
मैत्री हा जर तुमचा कमजोर बिंदू असेल तर तुम्ही जगातील शक्तिमान व्यक्ती आहात.- अब्राहम लिंकन
मैत्रीचे धागे कोळ्यापेक्षाही बारीक असतात, पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात. तुटले तर श्वासानेही तुटतील, नाहीतर वज्राघातेनेही तुटणार नाहीत.- व.पु. काळे
'रोज आठवण यावी अस काही नाही, रोज भेट व्हावी असं काही नाही, एवढंच कशाला रोज बोलणं व्हावं असं ही काहीच नाही. पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री, आणि तुला याची जाणीव असणं ही झाली मैत्री.'- पु. ल. देशपांडे
व्हिडिओ:
तुमचे तुमच्या खास फ्रेंडसोबत भांडण झाले असेल, त्याचा/तिचा राग आला असेल किंवा तुम्ही रुसले असाल तर फ्रेंडशिप डे निमित्त सारा राग-रुसवा बाजूला सारुन पुन्हा गोडीने एकत्र येण्याची ही खास संधी आहे. तर यंदाचा फ्रेंडशिप डे ला तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत धम्माल करा.