![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/07/Untitled-design-2019-07-30T101226.216-380x214.jpg)
मैत्री (Friendship) हे एक असं नातं आहे जे शब्दांपलीकडे, सर्व नात्यांपेक्षा वेगळे ज्यात कोणता दर्जा नाही, मतभेद नाही. देव ज्यांना रक्ताच्या नात्यात जोडायला विसरतो ती म्हणजे मैत्री. ही मित्र टिकून राहावी यासाठी आपण वाटेल ते करायला तयार असतो. आपल्या सुख-दु:खात खांद्याला खांदा लावून आपल्या सोबत उभे राहणारे मित्र आजच्या कलियुगात सापडणे थोडं अवघडच आहेत. त्यामुळे ते सापडले म्हणजे भाग्यच म्हणायला हवे. मित्र,मैत्रिण हे आयुष्यातील अशा व्यक्ती आहेत की, ज्यांच्या सोबत तुम्ही अशा गोष्टी शेअर करु शकता ज्या कदाचित तुम्ही तुमच्या आई-बाबांसोबत शेअर करण्यास थोडे संकुचित व्हाल. आयुष्यात मोलाचे संदेश देणारे, दु:खात आपल्या पाठीशी खंबीर पणे उभे राहणारे मित्र म्हणजे मैत्री.
या मित्रांचे विशेष आभार मानण्याचा, त्यांचा आपल्या आयुष्यात असणे किती मोलाचे आहे पटवून देण्याचा दिवस म्हणजे फ्रेंडशिप डे (Friendship Day). ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार हा फ्रेंडशिप डे म्हणून साजरा केला होता. फ्रेंडशिप डे कल्पना 1935 मध्ये युनायटेड स्टेट काँग्रेस ने सुरु केली. त्यानंतर हळू हळू या फ्रेंडशिप डे लोण जगभरासह भारतात आले. या फ्रेंडशिप डे ला खास करण्यासाठी तुमच्या मित्राला काही तरी गिफ्ट देऊन हा दिवस अविस्मरणीय करायचा असाल तर 10 गिफ्ट आयडियाज नक्कीच तुमच्या कामी येईल.
1. पिवळ्या फुलांचा गुच्छ
जसे लाल फुल हे प्रेमाचे प्रतीक असते तसे पिवळे फुल हे मैत्रीचे प्रतीक असते. म्हणून या दिवशी तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना पिवळे फूल किंवा पिवळ्या फुलांचा गुच्छ गिफ्ट म्हणून देऊ शकता.,
2. केक
तुमच्या अंतरंगी मित्रांना गिफ्ट म्हणून केक द्यायचा असेल तर आजकाल बाजारात कस्टमायज्ड केक ही मिळतो. त्यात तुमच्या मित्र,मैत्रिणींची खास गोष्ट किंवा खास आठवण तुम्ही केकच्या रुपात देऊन तुमच्या भावना व्यक्त करु शकतात.
3. पर्सनलाइज्ड मग
सध्या फोटो स्टुडिओमध्ये किंवा गिफ्ट शॉप्समध्ये पर्सनलाइज्ड मग बनवून मिळतात. यात तुमच्या तुमच्या दोस्तांसोबतचा फोटो किंवा एखाद्या आठवणींचा फोटो लावून सुंदर मेसेज लिहिलेा मग तुम्ही तुमच्या दोस्ताला देऊ शकता.
हेही वाचा- ब्रेकअप झाल्यानंतरही गर्लफ्रेंडशी मैत्री ठेवायची असेल, तर या 4 महत्त्वाच्या टीप्स येतील कामी
4. चॉकलेट
जर तुमच्या मित्र-मैत्रिणींचा चॉकलेट्स आवडत असतील तर बाजारात बरेच हँडमेड चॉकलेट्स किंवा अन्य चॉकलेट्स मिळतात. ते तुमच्या दोस्ताला देऊन तुम्ही हा दिवस गोड करु शकता.
5. मेमरी बुक
तुमच्या मित्रासोबत असलेल्या अनेक जुन्या-नवीन आठवणींचे एखादं छान बुक बनवून मित्राला देणे हा देखील एक उत्तम पर्याय आहे. आजकाल ब-याच गिफ्ट शॉप्स असे मेमरी बुक मिळतात. अथवा तुम्ही युट्यूब वर पाहून हँडमेड मेमरी बुकही बनवू शकता.
6. फ्रेंडशिप डे कार्ड
ग्रिटिंग्स कार्ड हा देखील एक छान पर्याय आहे. त्यात आजकाल बाजारात मेसेजेस सोबत म्युजिकल, मजेशीर असे बरेच ग्रिटिंग्स कार्ड्स चे पर्याय उपलब्ध आहेत.
7. परफ्यूम
तुमच्या मित्र-मैत्रिणींना सुगंधित परफ्यूमची आवड असेल, तर त्याला एक छानसा परफ्यूम गिफ्ट करु शकता.
8. फोटो कॅलेंडर
आजकाल फोटो कॅलेंडर हा देखील एक उत्तम पर्याय आहे. फोटो कॅलेंडर तुमच्या दोस्तांसोबतच्या गोड आठवणींचे फोटो किंवा काही विशेष दिवसाची विशेष आठवण असेल तर त्यात सुंदर मेसेजेस तुम्ही लिहू शकता.
9. सॉफ्ट टॉईज
मित्रांना विशेषकरुन मुलींना सॉफ्ट टॉईज खूप आवडतात. अशा वेळी तुम्ही फ्रेंडशिप मेसेजेस असलेले सॉफ्ट टॉईज देऊ शकता.
10. मेसेजेस लॉकेट
गळ्यात फ्रेंडशिपचे वेगवेगळ्या भागात विभागलेले लॉकेट्स तुम्ही गिफ्ट म्हणून तुमच्या मित्राला देऊ शकता.
या गिफ्ट आयडियाजनीं तुम्हाला तुमचा फ्रेंडशिप डे थोडा हटके आणि अविस्मरणीय करता येईल. शेवटी मैत्री म्हणजे काय हो, 'जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या मनाची काळजी तुमच्या मनापेक्षा जास्त घेता, याची जाणीव म्हणजेच मैत्री'. हॅप्पी फ्रेंडशिप डे.....