ब्रेकअप झाल्यानंतरही गर्लफ्रेंडशी मैत्री ठेवायची असेल, तर या 4 महत्त्वाच्या टीप्स येतील कामी
Break Up (Photo Credits-Pixabay)

आपल्या गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ब-याचदा मुले त्यांचीशी पुर्णपणे संपर्क तोडून देतात किंवा त्यांच्या गर्लफ्रेंडचं त्यांच्याशी बोलणे टाळतात. अशावेळी अनेकदा मुलांची अशी इच्छा असते आपल्या गर्लफ्रेंडने आपल्यासोबत मैत्री कायम ठेवावी. पण अनेकदा आपल्या वागण्यातून, विचारातून दुखावलेली गेलेली गर्लफ्रेंड तसे होऊ देत नाही. तर अनेकदा आपण स्वत:च तिच्याशी बोलणे टाळतो. मात्र काही प्रेम प्रकरण अशी असतात की, ज्यात बॉयफ्रेंडची तिच्या गर्लफ्रेंडसोबत खूप चांगली जवळीक निर्माण झाली असते. त्यामुळे आपली एक्स गर्लफ्रेंड आपल्याला चांगला सल्ला देण्यासाठी कायम एक मैत्रिण म्हणून आपल्या सोबत असावी असे वाटत असते. पण तसे होत नाही.

याला मूळ कारण असते ते म्हणजे आपला स्वभाव. म्हणूनच जर तुम्हाला तुमच्या एक्स गर्लफ्रेंडशी मैत्री ठेवायची असेल तर पुढील 4 गोष्टींचा विचार करायला काही हरकत नाही.

1. एका चांगल्या मित्रासारखे वागा

ब्रेकअप झाल्यानंतर शक्य तितके आपल्या एक्सशी अगदी नम्रतेने आणि नीट वागा. त्यांना दाखवून द्या की, अशा वेळीही तुम्ही तिचे चांगले मित्र होऊ शकता. त्यांना विश्वास द्या की तुम्ही मागच्या सर्व गोष्टी विसरून तिच्याशी चांगली मैत्री करु इच्छिता.

2. तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला

बहुधा आपल्या स्वभावामुळे आपले आपल्या गर्लफ्रेंडशी ब्रेकअप होते. त्यामुळे एखादे तुटलेले नाते जबरदस्तीने जोडण्याचा प्रयत्न करु नका किंवा तुमच्या एक्सवर कशाची बंदी करुन नका. त्यांच्या प्रती बघण्याचा तुमचा दृष्टिकोन बदला.

3. तिच्यासोबत उपकाराची भाषा करु नका

ब-याचदा ब्रेकअप झाल्यानंतर आपण आपल्या गर्लफ्रेंडसोबत नाते ठेवून तिच्यावर किती उपकार केले हे पदोपदी दाखवतो. मात्र ब्रेकअप झाल्यानंतर असे करणे टाळा. त्यामुळे तिच्या मनात तुमच्याविषयी कधीच आदर निर्माण होणार नाही. त्याउलट तुम्ही तिच्यासोबत जो चांगला वेळ घालवलात त्याविषयी तिचे आभार माना.

हेही वाचा- Break Up झाल्यावर पुन्हा त्याच नात्यात अडकायचे आहे ? तर 'या' गोष्टी जरुर लक्षात ठेवा

4. तुमच्या बोलण्यावर थोडे नियंत्रण ठेवा

अनेकदा ब्रेकअप झाल्यानंतर आपले आपल्या बोलण्यावर नियंत्रण राहत नाही. अशावेळी एकमेकांमध्ये झालेल्या भांडणात अनेकदा आपल्या तोंडून काही अपशब्द निघतात, ज्याने समोरचा व्यक्ती दुखावला जाऊ शकतो.

आपण आपल्या एक्स गर्लफ्रेंड सोबत जे छान क्षण घालवलेत, तेच आठवून ब्रेकअपनंतरही आपली तिच्यासोबत मैत्री कायम राहावी अशी आपली इच्छा असते. मात्र आपल्या गैरवर्तणूकीमुळे आपण ती मैत्री ही गमावतो. त्यामुळे या वरील 4 गोष्टींचा विचार करायला काही हरकत नाही.