Dussehra Wishes in Marathi (File Photo)

Vijayadashami Dasara Wishes in Marathi:: अश्विन शुद्ध दशमी चा दिवस म्हणजे दसरा (Dussehra) अर्थात विजयादशमी (Vijaya Dashami). नवरात्रीची सांगता दसरा हा सण साजरा करून केली जाते. साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक दिवस असल्याने या दिवशी कोणतीही शुभ कार्य मुहूर्त न पाहता केली जातात. नव्या वास्तूमध्ये प्रवेश ते गाडी खरेदी, सोनं खरेदी असे अनेक मोठे व्यवहार या दिवशी हमखास केले जातात. या दिवसाचा जेवणाचा बेत देखील गोडा-धोडाचा असतो. मग अशा या मंगल दिवसाच्या शुभेच्छा तुमच्या नातेवाईकांना, मित्र मंडळींना, आप्तेष्टांना देऊन हा दिवस खास करायचा असल्यास आम्ही तयार केलेली ही मराठमोळी शुभेच्छापत्रं, ग्रीटिंग्स, Wishes, Messages, GIFs तुम्ही शेअर करू शकता.

दसर्‍याच्या दिवशी शस्त्रपूजन देखील केले जाते. घरात अवजारांची, वही, पुस्तकं, लॅपटॉप्स ते कलाक्षेत्रातील लोकं त्यांच्या वाद्यांची, घुंगरांची पूजा करतात. हे देखील नक्की वाचा: Dussehra 2022 Rangoli Designs: दसरा दिवशी 'या' आकर्षक रांगोळ्यांनी साजरा करा साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस.

दसर्‍याच्या हार्दिक शुभेच्छा (Dussehra Wishes in Marathi)

Dussehra Wishes in Marathi (File Photo)

श्रीरामाचा आदर्श घेऊन

रावणरूपी अहंकाराचा नाश करत

साजरा करूया दसरा

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा

Dussehra Wishes in Marathi (File Photo)

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

Dussehra Wishes in Marathi (File Photo)

उत्सव हा विजयाचा

दिवस सोनं लुटण्याचा

जुने हेवे दावे विसरून सारे

दिवस फक्त आनंद लुटण्याचा

दसरा व विजयादशमी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

Dussehra Wishes in Marathi (File Photo)

झेंडूचे तोरण लावा दारी,

सुखाचे किरण येऊ दे घरी,

पूर्ण होऊ द्या तुमच्या सर्वा इच्छा,

विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा

Dussehra Wishes in Marathi (File Photo)

आपट्याची पाने, झेंडूची फुले,

घेऊनी आली आश्विनातली “विजयादशमी”

दसर्‍याच्या आज शुभ दिनी

सुख समृद्धी नांदो तुमच्या जीवनी

शुभ दसरा

Dussehra Wishes in Marathi (File Photo)

निसर्गाचं दान आपट्याचं पान

त्याला सोन्याचा मान

तुमच्या आयुष्यात नांदो सुख-शांती  समाधान

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

यंदा नऊ दिवसांच्या नवरात्रीनंतर दहाव्या दिवशी म्हणजे 5 ऑक्टोबरला दसरा साजरा केला जाईल. या दिवशी विजय मुहूर्त दुपारी 2 वाजून 26 मिनिटं ते दुपारी 3 वाजून 13 मिनिटं असा आहे. संध्याकाळी सोनं म्हणजेच आपट्याची पानं एकमेकांना देऊन हा दिवस साजरा केला जातो.