
Bhim Jayanti 2021 Messages: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो त्या महापुरुषाचा म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा (Dr. Babasaheb Ambedkar) जन्मदिन हा देशभरात भीम जयंती वा आंबेडकर जयंती म्हणून साजरा केला जातो. या दिवशी अनेक ठिकाणी सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदा डॉ. आंबेडकरांची 130 वी जयंती आहे. या दिवशी आंबेडकरांचे अनुयायी चैत्यभूमीवर एकत्र येऊन डॉ. आंबेडकरांना विनम्र अभिवादन करतात. या दिवशी भीमसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह असतो. मात्र यंदा कोरोनाचे सावट असल्याने सर्वांना एकत्रितरित्या जमता येणार नाही.
कोरोना स्थितीचे भान राखून आंबेडकरांच्या अनुयायांनी घरात राहून हा उत्सव साजरा करावा. अशा वेळी सोशल मिडियाच्या माध्यमातून आपण एकमेकांना भीम जयंतीच्या शुभेच्छा देऊ शकतो.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ते
शिक्षणाचा प्रसार करणारे ज्ञान देवता ते
दीन-दुबळ्यांच्या हाकेस धावून जाणारे महापुरुष ते
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन

स्पृश्य-अस्पृश्यता भेदभाव दूर केला ज्यांनी
दलित समाजासाठी आपले आयुष्य वेचले ज्यांनी
त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस
जयंतीनिमित्त अभिवादन करु मिळून सर्वांनी
भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन !

कुणी म्हणतात भिमराव, कुणी म्हणतात बाबा
अशा या महामानवाचा आजही आहे सर्वांवर ताबा
भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

समुद्राचे पाणी कधी आटणार नाही
बाबांची आठवण कधी मिटणार नाही
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!

सण-उत्सव म्हटले की एकत्रित जमून तो साजरा करावा असे प्रत्येकाला वाटते. मात्र सध्याची कोरोनाची स्थिती लक्षात घेता सामाजिकतेचे भान राखत आणि स्वत:च्या आरोग्याची काळजी भीम जयंतीचा उत्सव साजरा केला पाहिजे यातच सर्वांचे हित आहे.