
Happy Ambedkar Jayanti 2020 Wishes and Images: भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार म्हणून ओळख असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज (14 एप्रिल) जयंती आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी देशासाठी आणि समाजासाठी अहोरात्र कार्य करुन सामाजिक बांधिलकीसह राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्यामुळे आंबेडकर यांचा आदर्श नेहमीच लोकांच्या मनात उच्च स्थानी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक अष्टपैलू व्यक्तीमत्व होते. त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान आणि माहिती होती. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीन, दलितांच्या, श्रमिकांच्या विस्थापितांच्या, शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सत्याच्या मार्गावर चालणारे खरे मार्गदर्शक होते. भ्रष्टाचार, अनीति, अत्याचार, अन्यायास त्यांचा प्रखर विरोध होता. जातीभेदाच्या ते विरोधात होते. जातीभेद म्हणजे समाजाला लागलेली किड ते मानायचे. ही सामाजिक किड नष्ट केल्याशिवाय समाज एकसंघ होणार नाही असे ते समजत. डॉ. आंबेडकर म्हणजे तळागळातील लोकांना बौद्धिक व समाजिक गुलामगिरीतून मुक्त करुन त्यांना मंत्र देणारे एक पथदर्शक होते. शिकल्याशिवाय आपल्यावरील न्याय, अन्याय, आपले हक्क ही आपल्याला कळत नाही अशा प्रकारे त्यांनी सामाजिक क्रांतीचे घडवून आणली. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शुभेच्छा Wishes, Messages, HD Wallpapers पाठवून साजरा करा आजचा दिवस (Ambedkar Jayanti 2020 Wishes: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मराठामोळे Messages, Wishes, Greetings शेअर करून साजरी करा यंदा भीम जयंती!)





जगातील आदर्श समाज निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांनी लोकशाही पद्धतीचा स्विकार केला. त्यासाठी एक व्यक्ती,एक मत, एक मूल्य आणि एक किंमत हा सिद्धांत दिला. परंतु राजकीय लोकशाही असली तरीही त्याचे रुपांतर सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीत व्हावे असे त्यांना वाटत होते. असे केल्याने जगापुढे देश टिकेल अन्यथा अडचणीत येईल असे बाबासाहेबांना वाटत होते. त्यामुळे जगाला शोभेल आणि भारताला आधुनिक काळात सर्व प्रकारच्या सुविधा आणि सर्वांगीण विकास करण्यासाठी राष्ट्राला राज्यघटना दिली.