International Dog Day Photo Credit Insta

International Dog Day: हजारो वर्षापासून मानवाच्या सोबतीने राहणारा कुत्रा हा एकमेव प्राणी आहे. जस जसं आधुनिक तंत्रज्ञान बदलत गेले तस तसं कुत्र्याच्या प्रजाती वाढू लागल्या. सुरुवातील कुत्रा शेतीसाठी वापरला जायचा पण आता घरातील संपूर्ण कुटुंबासाठी एक महत्त्वाचा सदस्य बनला आहे. दरवर्षी २६ ऑगस्ट रोजी दरवर्षी आंतरराष्ट्रीय कुत्रा दिवस साजरा केला जातो. कुत्रा हा माणसाचा जवळचा मित्र होऊ लागला आहे. तणाव मुक्ती करण्यासाठी श्वान प्रेमी आपल्या पाळीव कुत्र्यावर भरपूर प्रेम करतात. (हेही वाचा- आंतरराष्ट्रीय श्वान दिन, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व)

आंतरराष्ट्रीय कुत्रा दिवस 2004 मध्ये प्राणी कल्याण कार्यकर्ता आणि पाळीव प्राणी जीवनशैली तज्ञ कॉलीन पायगे यांनी पहिल्यांदा साजरा केला.  कुत्र्यांच्या संगोपनासाठी जगभरात कामे केली जातात. मागील काही वर्षापासून काही लोकांनी पुढाकार घेतला आहे.

जवळपास काही अपवाद वगळताच, सर्वेच लोक कुत्रे पाळतात. आज या खास दिवसानिमित्त पेट पालक म्हणून आपल्या पाळीव प्राण्यासोबत करा या खास अॅक्टीवीटी. जेणेकरून आपला प्राणी आनंदी राहिल आणि तणाव मुक्त राहतील.

१. व्यायाम आणि योगा - नवीन ट्रेडनुसार, आज काल मालकासोबत कुत्र्यांचे व्यायाम किंवा योगा क्लास सुरु झाले आहे. आपल्या पाळीव प्राण्यासोबत योगा किंवा व्यायाम करा. जेणेकरून त्यांची मानसिक आणि शारिरीक आरोग्य सुदृढ राहिल.

२. नवीन खेळणी- या खास दिनानिमित्त त्यांना नवीन खेळणी आणून द्या. त्यांच्यासाठी हा दिवस स्पेशल बनवा. (Tug-of-War) रस्सी खेच हा त्यांचा आवडता खेळ आहेत. मार्केटमध्ये या सारखे नववीन खेळणी उपलब्ध आहेत.

३. प्ले डेट- आपल्या श्वानासाठी एक प्ले डेट (Play Date) प्लॅन करा. त्यासोबत तुम्ही पेट कॅफेमध्ये जाऊ शकता. तेथे नवनवीन कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवा.

४. पाण्यातील खेळ - जर तुमच्या कुत्र्याला पाण्यात खेळायला आवडत असेल, तर त्यांना जवळच्या बीच किंवा स्विमिंग पूलमध्ये घेऊन जा. पाण्यात खेळल्याने त्यांना आनंद आणि व्यायाम मिळेल. याशिवाय त्यांना डॉग पार्कमध्ये घेऊन जाऊ शकता.

५. आरोग्य तपासणी -  आपल्या कुत्र्यांचे वेळोवेळी डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या. योग्यवेळीस डॉक्टरांचे सल्ले घ्या. किंवा या दिवशी स्पेशल ऑफरमध्ये केअर किट्स घ्या.