Dhanteras 2020 Wishes in Marathi (Photo Credits: File)

Happy Dhanteras 2020 Wishes in Marathi: वर्षभर ज्या सणाची सर्व भारतीय आतुरतेने वाट पाहतात तो दिवाळी सण अखेर आला. यंदा 14 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन आणि नरक चतुर्दशी आली आहे. त्याच्या आदल्या दिवशी 13 नोव्हेंबरला धनत्रयोदशी (Dhantrayodashi) आहे. आश्विन महिन्याच्या १३व्या दिवशी असते. या दिवशी देवांचा वैद्य धन्वंतरी याचा जन्म झाला. म्हणून या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात. काही लोक या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा करतात. या दिवशी सोन्या-चांदीची खरेदी केली जाते. त्यांची पूजा केली जाते. व्यापारी वर्गासाठी हा दिवस फार खास असतो. यंदा सोशल डिस्टंसिंग राखून या सणाचा उत्साह वाढविण्यासाठी तुम्ही घरबसल्याही केवळ एका क्लिकवर एकमेकांना धनतेरसच्या शुभेच्छा (Dhanteras Wishes) देऊ शकता.

तसं पाहायला गेले तर सण म्हटला की, लोक एकत्र जमतात आणि आनंदात तो सण साजरा करताता. मात्र यंदा कोरोना व्हायरसमुळे गर्दी न करता सोशल डिस्टंसिंग राखून आपल्याला सर्व सण साजरे करायचे आहेत. यामुळे तुम्ही निराश न होता सोशल मिडियाच्या माध्यमातून छान मराठी संदेश पाठवू शकता.

धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!

 

Dhanteras 2020 Wishes in Marathi (Photo Credits: File) Dhanteras 2020 Wishes in Marathi (Photo Credits: File)

धनत्रयोदशीच्या निमित्ताने

आपणास व आपल्या कुटुंबास

धन आणि आरोग्य लाभो या सदिच्छा

शुभ दीपावली!

हेदेखील वाचा- Diwali 2020: धनतेरस च्या दिवशी का खरेदी करतात सोने-चांदी किंवा तांब्या-पितळाची भांडी? जाणून घ्या यंदाचा शुभ मुहूर्त

Dhanteras 2020 Wishes in Marathi (Photo Credits: File)

धनतेरसच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!

Dhanteras 2020 Wishes in Marathi (Photo Credits: File)

धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,

विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..

या दिपावलीत अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,

धनत्रयोदशी आणि दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा

Dhanteras 2020 Wishes in Marathi (Photo Credits: File)

 

धनत्रयोदशीच्या शुभदिनी,

आपुल्या सदनी व्हावी बरसात धनाची

करोनी औचित्य दिपावलीचे,

बंधने जुळावी मनामनांची...

धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा

Dhanteras 2020 Wishes in Marathi (Photo Credits: File) Dhanteras 2020 Wishes in Marathi (Photo Credits: File)

हिंदू धर्मातील प्रमुख सणांपेकी एक असलेल्या दिवाळी सणाचा पहिला दिवस म्हणून ओळखल्या जाणार्‍या धनत्रयोदशीने दिवाळीपर्वाला प्रारंभ होतो. या दिवशी संध्याकाळी दुकानांमध्ये पूजा केली जाते. हिशेबाच्या नव्या वह्यांचा वापर या दिवसापासून सुरू करण्याचा प्रघात आहे.