Children's Day India 2019: देशभरात आज बालदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. प्रतिवर्षी 14 नोव्हेंबरला बालदिन साजरा केला जातो. भारताचे पहिले पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जन्मदिनी बालदिन साजरा केला जातो. इंटरनेट विश्वातील सर्वात मोठे सर्च इंजिन Google सुद्धा आपल्या खास पद्धतीने बालदिन साजरा करत आहे. गूगलच होमपेजवर सुंदर असे Doodl साकारत गूगलने बालदिन साजरा केला आहे. बालदिन गुगल डुडल अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. विशेष म्हणजे यंदाचे बालदिन गुगल डूडल दिव्यांशी सिंघल या गुरुग्राम येथील मुलीने साकारले आहे.
सात वर्षांची असलेल्या दिव्यांशी सिंघल हिचे डूडल 'Walking Trees' या संकल्पनेवरती आधारीत आहे. हे डूडल आपल्या येणाऱ्या पिढीला पर्यावरण, वनं आणि वृक्षांच महत्त्व पटवून देईल. गूगल प्रतिवर्षी बालदिनी डूडलसाठी एका स्पर्धेचे आयोजन करतो. स्पर्धेतून आलेल्या अनेक संकल्पनांतून एकाची निवड करत गूगल डूडल होमपेजव प्रसिद्ध करत असते. दिव्यांशी सिंघल हिने बनवलेला 'Walking Trees' संकल्पनेवरील गूगल डूडल झाडे लावण्याचा व झाडे न कापण्याचा संदेश देत आहे.
गेल्या 10 वर्षांपासून गूगल स्कूल स्टूडेंटच्या माध्यमातून गूगल इंडिया होमपेजसाठी डूडल बनविण्यासाठी सांगते आणि त्यातून एकाची निवड करत बेस्ट डूडल बालदिनाला गूगल होमपेजवर दाखवते. या वर्षीची गूगड डूडलची थीम 'When I grow up, I hope...' अशी होती. आजच्या गूगड-डूडलमध्ये दिव्यांशीने झाडांना पायात बूट घालून चालताना दाखवले आहे. (हेही वाचा, Junko Tabei Google Doodle: एव्हरेस्ट पार करणाऱ्या पहिल्या महिला जुन्को ताबेई यांच्यावर खास गूगल डूडल)
दरम्यान, 20 नोव्हेंबर 1954 मध्ये बालदिन साजरा करण्याची घोषणा यूएनने केली होती. भारतातही हा दिवस 20 नोव्हेंबरलाच साजारा केला जात असे. दरम्यान, 27 मे 1964 रोजी पंडित जवाहरलाल नेहरु यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर नेहरुंचा जन्मदिन हा बालदिन म्हणून भारतात साजरा जाऊ लागला. पंडीत नेहरु यांना असलेली लहान मुलांची आवड म्हणून देशभरात बालदिन साजरा केला जाऊ लागला.