Shivrajyabhishek Sohala 2020: शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांची महती सांगणारी '5' मराठी गाणी
Shivrajyabhishek Sohala 2020 (Photo Credits: Instagram)

Chhatrapati Shivaji Maharaj Songs: छत्रपती शिवाजी महाराजांची किर्ती, त्यांची महती शब्दांत व्यक्त करता येणार नाही अशीच आहे. एखाद्या निर्भेद तटबंदीसारखा महाराष्ट्राच्या जनतेचे रक्षण करणा-या आणि शत्रूशी दोन हात करून त्यांना नेस्तनाभूत करणा-या शिवरायांचा आज शिवराज्याभिषेक सोहळा दिन. या दिवशी शिवरायांच्या पराक्रमाची गाथा सांगणारी काही खास गाणी ऐकावी असे प्रत्येक शिवभक्ताला वाटत असेल. मराठी चित्रपटांत अशी काही गाणी आली जे ऐकून प्रत्येक शिवभक्ताचे रक्त सळसळेल आणि आपल्या महाराजंच्या शौर्यगाथा ऐकून छाती अभिमानाने फुलून येईल.

यंदा लॉकडाऊन आपल्याला रायगडावर हा शिवराज्याभिषेक सोहळा जाऊन साजरा करता आला नाही म्हणून अनेकांच्या मनात आज खदखद असेल. मात्र आपम आपल्या घरात राहूनही हा आनंद, हा उत्साह कायम ठेवू शकता. Shivrajyabhishek Sohala 2020 Wishes: शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या मराठमोळ्या शुभेच्छा Greetings, Messages, Whatsapp Status, Facebook, Images च्या माध्यमातून देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने निनादून टाका आसमंत सारा

ऐकूयात काही सुंदर गाणी:

शिवराज्याभिषेक गीत

हे राजे जिरं जी

हेदेखील वाचा- Shivrajyabhishek Sohala 2020: शिवराज्याभिषेक दिनी ऐकूया छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावरील खास पोवाडे!

शिवबा आमचा मल्हारी

शूर आम्ही सरदार आम्हाला 

वेडात मराठी वीर दौडले सात

शिवछत्रपती हे केवळ नाव नसून ते एक वादळ आहे, महाराष्ट्राची एक भक्कम भिंत आहे ज्याला तोडण्याचा प्रयत्न करणा-या शत्रूला शिवछत्रपतींनी धूळ चारली.अशा या छत्रपती शिवाजी महाराजांना लेटेस्टली मराठीचा मानाचा मुजरा!