Chhatrapati Shivaji Maharaj Powada: पोवाडा म्हटलं की आपल्याला शिवाजी महाराजांवर केलेले पोवाडे विशेषत: आठवतात. स्फूर्ती देणारा हा गीत प्रकार असून यात अनेक वीरांच्या पराक्रमांचे, विद्वानांच्या बुद्धिमत्तेचे, सामर्थ्याचे, गुणांचे कौतुक केले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी पराक्रम, शौर्य, चातुर्य, बुद्धीमत्ता यांच्या जोरावर हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. छत्रपतींच्या या गुणांचे वर्णन लोककलावंतांनी पोवाड्यातून केले आहे. या पोवाड्यातून महाराजांचे पराक्रम आपल्या डोळ्यासमोर हुबेहुब उभे राहतात. आज 6 जून. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन. आज छत्रपती शिवाजींच्या राज्याभिषेकदिनी पाहुया त्यांच्यावरील काही खास पोवाडे. (शिवराज्याभिषेक सोहळ्या निमित्त मराठी संदेश, Wishes, Greetings, Whatsapp Stickers, Images च्या माध्यमातून Facebook, WhatsApp वर शेअर करून शिवरायांना द्या मानवंदना!)
हिरकणी सिनेमातील शिवराज्याभिषेकावरील सुंदर गीत.
शाहीर पिलाजीराव सरनाईक यांच्या आवाजातील या पोवाड्यात शिवशाहीचा इतिहास यात सांगितला आहे.
'शिवरायांची सून ताराराणी' सिनेमातील खास पोवाडा.
'बघतोस काय मुजरा कर' सिनेमातील सिद्धार्थ महादेवन याच्या आवाजातील शिवाजी महाराजांचा खास पोवाडा.
शिवाजी राजे भोसले बोलतोय या सिनेमातील अफजलखानाच्या वधाची कहाणी पोवाड्यातून मांडण्यात आली आहे.
शिवाजी महराज हे महाराष्ट्राचे दैवतच. आदर्श राज्यकर्ता म्हणून त्यांचे नाव अगदी अगत्याने घेतले जाते. जनमानसांत आपल्या गुणांमध्ये अढळ स्थान निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना आज राज्याभिषेक दिनी मानाचा मुजरा!