Shivrajyabhishek Sohala 2020 Marathi Messages: हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा (Shivrajyabhishek Sohala) दरवर्षी 6 जून रोजी रायगडावर साजरा केला जातो. खरंतर शिवराज्याभिषेक दिनाबद्दल वाद आहे. त्यामुळे तिथीप्रमाणे आणि तारखेप्रमाणे हा सोहळा साजरा केला जातो. 6 जून रोजी तारखेप्रमाणे रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याची उत्सुकता असते. तर तिथीप्रमाणे तो ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी दिवशी केला जातो. उद्या 6 जून रोजी म्हणजे तारखेप्रमाणे शिवराज्याभिषेक साजरा करण्याचा दिवस. मात्र यंदा कोरोना व्हायरस संकटामुळे शिवभक्तांना रायगडावर एकत्र जमणे शक्य होणार नाही. म्हणूनच यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा घरात बसूनच साजरा करा, असं आवाहन खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी केले आहे. Shivrajyabhishek Din 2020 Messages: शिवराज्याभिषेक दिन निमित्त मराठमोळ्या शुभेच्छा, Wishes, HD Images, Quotes च्या माध्यमातून शेअर करून शिवरायांना करा मानाचा मुजरा!
6 जून 1674 दिवशी शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला होता. शिवरायांना मिळालेला छत्रपती होण्याचा सन्मानाचा दिवस सर्व शिवप्रेमी अगदी जल्लोषात साजरा करतात. खरंतर संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा दिवस म्हणजे अभिमानाचा आणि आनंदाचा असा आहे. त्यामुळे या दिवसाचा आनंद रायगडावर जावून साजरा करता येणार नसला तरी आपल्या नातेवाईकांसह, मित्रमंडळी, शिवभक्तांना सोशल मीडियाच्या विविध माध्यमातून शुभेच्छा देऊन शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह कायम ठेवू शकता. यासाठी आम्ही तुमच्यासाठी खास मराठमोळे शुभेच्छा संदेश, मेसेज, ग्रिटिंग्स घेऊन आलो आहोत. ही शुभेच्छापत्रं व्हॉट्सअॅप, फेसबुक वर शेअर करुन शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शुभेच्छा द्या.
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शुभेच्छा!
लौकीक राजाच्या कीर्तीचा
क्षितीजापार गेला
महाराष्ट्रभूमीचा स्वामी
छत्रपती झाला!!
शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा!
सह्याद्रीच्या कुशीत सनई चौघडे वाजले
रायगडाचे माथे फुलांनी सजले... पाहुन सोहळा
'छत्रपती' पदाचा 33 कोटी देवही लाजले...
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
होईल तुझ्या चरणी अवघा महाराष्ट्र गोळा,
वाट हिंदवी स्वराज्याचा श्री शिवराज्याभिषेक सोहळा
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
हिंदवी स्वराज्याचे तोरण
बांधुनिया गाजवी समरांगण
आई भवानी प्रसन्न होऊन
देई साक्षात्कार...
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शिवप्रेमींना शुभेच्छा!
आज शिवराज्याभिषेक दिन
तो नेत्रदीपक सोहळा..
रायगडाने पाहिला..
जेव्हा मराठ्यांच्या धनी..
छत्रपती जाहला..
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
WhatsApp Stickers च्या माध्यमातून द्या आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा:
सण समारंभ यांच्या शुभेच्छा देण्यासाठी आजकाल WhatsApp अगदी सर्रास वापरले जाते. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शुभेच्छाही तुम्ही व्हॉट्सअॅप स्टिकर्सच्या माध्यमातून देऊ शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर Shivrajyabhishek Sohala टाईप करा आणि डाऊनलोड करुन तुमच्या नातेवाईक, मित्रमंडळींना पाठवा.
यंदाचा शिवराज्याभिषेक दिन तिथीनुसार 4 जून रोजी होता. तर तारखेनुसार उद्या म्हणजेच 6 जून रोजी पार पडणार आहे. दरम्यान कोरोना व्हायरसच्या संकटामुळे शिवभक्त घरातून शिवराज्यभिषेक सोहळा साजरा करणार आहेत.