Shivrajyabhishek Sohala 2020 Marathi Wishes: महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहावी अशी गोष्ट आपल्या 'छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा'. डोळ्यांचे पारणं फेडणारा हा शिवराज्याभिषेक सोहळा ज्यांनी पाहिला त्यांच्या जीवनाचे सार्थक झाले असेच म्हणावे लागेल. 6 जून 1674 रोजी शिवरायांनी गागाभट्ट यांच्याकडून आपला राज्यभिषेक सोहळा करून घेतला. तिथीप्रमाणे येणारा हा दिवस 4 जूनला तर तारखेप्रमाणे हा दिवस 6 जूनला साजरा केला जातो. रायगडावर झालेल्या या भव्य दिव्य सोहळ्याचा केवळ उल्लेखही केला तरी प्रत्येक शिवभक्ताची छाती अभिमानाने भरून येते. अशा शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शुभेच्छा प्रत्येक मराठी बांधवांना द्याव्यात आणि मोठ्या आनंदात आणि चैतन्यमय वातावरणात हा दिवस साजरा करावा असे प्रत्येकाला वाटत असेल.
अशा वेळी प्रत्येकाला गरज लागेल मराठमोळ्या शुभेच्छा संदेशांची. म्हणूनच महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांसाठी शिवराज्याभिषेक सोहळ्याचे खास मराठमोळे शुभेच्छा संदेश:
जिजाऊच्या पोटी जन्मला तो
निधड्या छातीने शत्रूशी लढला तो
जनतेसाठी लावली प्राणांची बाजी
शिवछत्रपती म्हणून ओळखू लागले शिवाजी
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
स्वराज्याचा ज्यांना लागला होता ध्यास
स्वराज्य मिळवणे ही एकच होती ज्यांची आस
त्यांच्या राज्याभिषेकाचा सोहळा रंगला आज खास
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस,
सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज,
शिव छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा ...!!!
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा
अवघ्या महाराष्ट्राला लागला ज्यांचा लळा
त्यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी शिवभक्त झाले गोळा
डोळ्यांचे पारणं फेडणारा असा हा राज्याभिषेक सोहळा
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा
जिजाऊच्या पोटी ज्यांनी घेतला जन्म
त्यांच्या शौर्याची गाथा संपूर्ण महाराष्ट्र विसरणार नाही आजन्म
अशा धुरंदर, पराक्रमी, कर्तव्यनिष्ठ शिवछत्रपतींच्या
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा
स्वाभिमानाची साक्षात मूर्ती असलेले शिवाजी राजे 6 जून या दिवशी छत्रपती झाले. शिवछत्रपती हे केवळ नाव नसून ते एक वादळ आहे, महाराष्ट्राची एक भक्कम भिंत आहे ज्याला तोडण्याचा प्रयत्न करणा-या शत्रूला शिवछत्रपतींनी धूळ चारली. अशा या लढवय्या, धुरंदर, पराक्रमी छत्रपती शिवाजी महाराजांस शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त मानाचा मुजरा!