शिवराज्याभिषेक सोहळा । Photo Credits: Twitter

शिवरायांचे भक्त दरवर्षी 6 जूनला रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा (Shivrajyabhishek Sohala) साजरा करण्यासाठी एकत्र जमतात मात्र यंदा कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर खासदार संभाजी राजे छत्रपती (Sambhaji Chhatrapati) यांनी महाराष्ट्रातील नागरिकांना हा दिवस घरच्या घरीच राहून हा दिवस साजरा करा असं आवाहन केले आहे. हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक 6 जून 1674 दिवशी गागाभट्टांसह मान्यवर ब्राम्हणांनी केला होता. आजही त्या सोहळ्याच्या स्मृती ताज्या ठेवण्यासाठी शिवजयंती (Shiv Jayanti) प्रमाणे शिवाजी महाराजांचे भक्त शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करतात. मात्र यंदा या प्रथेला खंड पडणार आहे.

महाराष्ट्रासह देशभरात कोरोना व्हायरस संकटाचा सामना करणार्‍या आपल्या राज्यात हे संकट परतवून लावण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न केले जात आहे. सध्या लॉकडाऊनचा पाचवा आणि अनलॉकचा पहिला टप्पा सुरू झाला असला तरिही नागरिकांना सामाजिक सण-उत्सव, सोहळे ते देवदर्शन यांच्यावर बंदी कायम आहे. त्यामुळे यंदा रायगडावर शिवभक्तांनी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त गर्दी न करण्याचं आवाहन करण्यात आले आहे.

खासदार संभाजी राजे छत्रपती यांचे ट्वीट

काल रात्रीपर्यंत महाराष्ट्र राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 77,793 वर पोहोचली आहे. आतापर्यंत राज्यात 2710 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या देशात सव्वा दोन लाखाच्या पार गेलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये सर्वाधिक रूग्ण महाराष्ट्रात असल्याने नागरिकांना अनावश्यक गर्दी टाळण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.