Chandra Grahan 2019: आज गुरुपौर्णिमे दिवशी रात्री 1.32 मिनिटांनी लागणारं चंद्रग्रहण कोणकोणत्या देशांत दिसणार? काय घ्याल काळजी ? जाणून घ्या सविस्तर
Chandra Grahan 2019 | Representational Image (Photo credits: Twitter/ChrisPage90)

Partial Lunar Eclipse 2019: 149 वर्षांनंतर आज प्रथमच गुरुपौर्णिमा (Guru Purnima)आणि खंडग्रास चंद्रग्रहण (Partial Lunar Eclipse)एकत्र आल्याचा दुर्मिळ योग आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. हे चंद्रग्रहण 2019 मधील शेवटचं चंद्रग्रहण (Chandra Grahan) आहे. हे ग्रहण भारतामधून दिसणार असल्याने येथील खगोलप्रेमींसाठी ही मोठी पर्वणी आहे.  जेव्हा पृथ्वी ही सूर्य व चंद्राच्या मध्ये येते, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण दिसते. जेव्हा चंद्राचा काही भाग पृथ्वीच्या सावलीत येतो त्यावेळी खंडग्रास चंद्रग्रहण स्थिती निर्माण होते.

चंद्र ग्रहणाचा कालावधी?

या चंद्रग्रहणाचा कालावधी 16 जुलै म्हणजे आषाढ पौर्णिमेच्या उत्तर रात्री ( बुधवार, 17 जुलैच्या पहाटे) 1.30 वाजल्यापासून 17 जुलैच्या पहाटे 4.30 वाजेपर्यंत आहे. त्यामुळे सुमारे 3 तास खंडग्रास चंद्रग्रहण होणार आहे. वेधारंभ 16 जुलैच्या दुपारी 4 वाजल्यापासुन सुरू होणार आहेत. तर ज्या व्यक्ती भारतामध्ये हे ग्रहण पाळणार आहेत त्यांनी रात्री 8.40 मिनिटांपासून ग्रहणाचे वेध पाळावेत असे अभ्यासकांनी सांगितले आहे.

कोणकोणत्या देशांत दिसणार खंडग्रास चंद्रग्रहण?

भारतासोबतच हे चंद्रग्रहण ऑस्ट्रेलिया, आफ्रीका, आशिया, यूरोप आणि दक्षिण अमेरिका या भागात दिसणार आहे.

काय घ्याल विशेष काळजी?

1. ग्रहणाच्या दिवशी जर तुम्हाला पाणी प्यायचे असेल तर त्यात तीळ किंवा तुळशीची पाने अवश्य टाका

2. ग्रहण संपल्यानंतर आंघोळ करुन देवघरातील देवांना देखील चांगली आंघोळ घालावी. तसेच संपूर्ण घरात धूप-बत्ती ने शुद्धीकरण करावे.

3. चंद्रग्रहणावेळी गरीबांचा अपमान करु नका. नदीत नारळ अर्पण करावा.

गर्भवती महिलांनी काय काळजी घ्यावी?

1. ग्रहण पाहू नये:

उघड्या डोळ्यांनी ग्रहण पाहू नये. मात्र हा नियम गर्भवती स्त्रियांनाच नाही तर सर्वांना लागू होतो.

2. विशिष्ट पदार्थ खाणे टाळा:

आंबवलेले, तिखट आणि तेलकट पदार्थ ग्रहण काळात खाणे टाळा. त्याचबरोबर मांसाहार देखील टाळणे योग्य ठरेल.

3. ध्यानधारणा आणि मंत्रोच्चार:

ग्रहणकाळात गर्भवती स्त्रियांनी काही काम करु नये, असे मानले जाते. त्यामुळे या काळात ध्यान करणे किंवा एखादे मंत्रपठण करणे फायदेशीर ठरेल.

4. शरीराची स्वच्छता राखा:

गर्भवती स्त्रियांनी ग्रहणकाळात दोनदा अंघोळ करावी. ग्रहण सुरु होण्यापूर्वी आणि ग्रहण संपल्यानंतर. त्यामुळे ग्रहणकाळातील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते.

हेही वाचा- Chandra Grahan 2019 On 16 July: गुरू पौर्णिमेदिवशी दिसणारे खंडग्रास चंद्रग्रहण ऑनलाईन कसे बघाल Live?

भारतामध्ये पुढील चंद्रग्रहण 26 मे 2021 दिवशी पाहता येणार आहे. ग्रहण ही खगोलीय स्थिती आहे. पण आपल्या समाजात त्याच्याबद्दल समज-गैरसमजच अधिक आहेत. यंदा आषाढ पौर्णिमेला म्हणजेच गुरू पौर्णिमेदिवशी ग्रहण आल्याने अनेकांच्या मनात गुरू पौर्णिमा यंदा कशी साजरी करावी असे प्रश्न आहेत. पौर्णिमा 16 जुलै दिवशी पहाटे 1.50 मिनिटांनी सुरू होईल तर 17 जुलैच्या उत्तररात्री 3. 08 मिनिटांंनी संपणार आहे

(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारीत आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)