उद्या जगातील विविध भागात चंद्रग्रहण (Lunar Eclipse) दिसणार आहे. भारतातही उद्याचं चंद्रग्रहण दिसणार असुन विविध राज्यामध्ये हे ग्रहण वेगवेगळ्या वेळात दिसणार आहे. कारण भारतीय वेळेनुसार उद्याचं खग्रास चंद्रग्रहण दुपारी 2 वाजून 39 मिनीटांनी सुरु होणार असुन संध्याकाळी 6 वाजून 19 मिनिटांनी समाप्त होईल. तरी भारतात चंद्रोदयाची वेळ सरासरी सहा वाजता नंतरची आहे. म्हणून भारतातील विविध शहरांमधून उद्याचं चंद्रग्रहण केवळ 15 ते 20 मिनिटांसाठी बघता येणार आहे. म्हणून भारतातील कुठल्याही शहरातून आशिक आणि खग्रास चंद्रग्रहणाच्या टप्प्याची सुरुवात दिसणार नाही. ग्रहण संपताना म्हणजेचं शेवटच्या काही मिनीटांत ग्रहण सुटतांना भारतीयांना चंद्र ग्रहण बघता येणार आहे. तरी चंद्रोदयाच्या वेळेनुसार वेगवेगळ्या शहरात वेगवेगळ्या शहरात चंद्रग्रहण बघता येणार आहे.
चंद्रग्रहण दिल्लीत (Delhi) 50 मिनिटे, मुंबईत (Mumbai) 18 मिनिटे, चेन्नई (Chennai) 40 मिनिट तर बेंगळुरूमध्ये (Bangalore) 29 मिनिटं दिसणार आहे. दरम्यान भारतातील चंद्रोदयाच्या वेळी, खग्रास समाप्तीनंतरचे आंशिक ग्रहण चालू असेल म्हणून भारतीयांना तेव्हा तेचं बघता येईल. संपूर्ण भारतात खग्रास चंद्रग्रहण (Lunar Eclipse) कुठेही बघता येणार नाही. (हे ही वाचा:- Dev Diwali 2022: आज देव दिवळी! त्रिपुरारी पौर्णिमेला का साजरी केली जाते देव दिवाळी? जाणून घ्या हिंदू संस्कृतीतील देव दिवळीचं महत्व)
भारतात, संपूर्ण चंद्रग्रहण फक्त पूर्वेकडील भागांमध्ये दिसेल आणि आंशिक ग्रहण भारताच्या बहुतांश भागांतून दिसेल. कोहिमा, आगरतळा, गुवाहाटी, कोलकाता, भुवनेश्वर, सिलीगुडी, पाटणा आणि रांची या शहरांमध्ये संपूर्ण चंद्रग्रहण पाहायला मिळेल तर दिल्ली, अहमदाबाद, बेंगळुरू, मुंबई, नागपूर, श्रीनगर, नोएडा, गुरुग्राम, चंदीगड, हैदराबाद, चेन्नई, सुरत, पुणे, जयपूर, लखनौ, मदुराई, उदयपूर, आणि भारताच्या पश्चिम, दक्षिण आणि उत्तर भागातील इतर शहरांमध्ये आंशिक चंद्रग्रहण पाहता येणार आहे.