World Students' Day 2023 Wishes: दरवर्षी 15 ऑक्टोबर हा दिवस जगभरात 'जागतिक विद्यार्थी दिन' (World Students' Day) म्हणून साजरा केला जातो. हा दिवस भारतरत्न पुरस्कार विजेते आणि माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती म्हणून साजरी केला जातो. भारताचे 11 वे राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी दरवर्षी जागतिक विद्यार्थी दिन साजरा केला जातो. डॉ. कलाम यांचे विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अतुलनीय योगदान, जगभरातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी केलेले कार्य पाहता, संयुक्त राष्ट्र संघाने त्यांचा 79 वा वाढदिवस सन 2010 मध्ये प्रथमच जागतिक विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला.
त्यांचा वाढदिवस 15 हा दिवस दरवर्षी ऑक्टोबरमध्ये साजरा करण्याचे ठरले. तेव्हापासून डॉ.कलाम यांचा जन्मदिवस विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जात आहे. जागतिक विद्यार्थी दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास शुभेच्छा संदेश, मेसेजेस, ग्रिटींग्स, HD Images. सोशल मीडियाच्या फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम या विविध माध्यमातून हे शुभेच्छा संदेश शेअर करुन तुम्ही विद्यार्थी दिनाच्या शुभेच्छा देऊ शकता.
सतत काही शिकत राहणे
हे खऱ्या विध्यार्थाचे लक्षण आहे
विद्यार्थी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
शिक्षणाने मनुष्य साक्षर होतो
व अनुभवाने तो शहाणा होतो
विद्यार्थी दिनाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!
काळा रंग अशुभ मानला जातो
पण प्रत्येक काळा रंगाचा फळा हा
अनेक विध्यार्थीचे आयुष्य उज्वल करतो
विद्यार्थी दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
जर तुम्हाला सूर्यासारखे चमकायचे असेल
तर आधी सूर्यासारखे जळा.
विद्यार्थी दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
स्वतःवर विश्वास ठेव आणि कधीही आशा सोडू नका. आयुष्यात तुम्हाला हव्या असलेल्या
सर्व गोष्टी तुम्ही साध्य करू शकता.
तुम्हाला विद्यार्थी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
विद्यार्थी जीवन म्हणजे
कठोर परिश्रम आणि वक्तशीर असणे.
कधीही विलंबाने डोळे झाकू देऊ नका.
विद्यार्थी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
डॉ.अब्दुल कलाम यांनी आयुष्यभर विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे लक्ष दिले. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी दिलेले योगदान आणि वैज्ञानिक क्षेत्रात केलेले कार्य पाहता त्यांचा वाढदिवस जागतिक विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.