Balika Diwas 2021 Image: महाराष्ट्र शासनाने 3 जानेवारी म्हणजेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बालिका दिन घोषित केला आहे. महाराष्ट्र राज्यात हा दिवस उत्सवात साजरा केला जातो. सावित्रीबाईंच्या सामजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून 1995 पासून 3 जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा “बालिकादिन ” म्हणून साजरा केला जातो. 19 व्या शतकाच्या मध्यार्थात भारतासारख्या रूढीवादी परंपरा असणाऱ्या देशात स्त्रीला समाजात 'चूल आणि मूल ' एवढेचं स्थान होतं. त्याकाळात स्त्रियांना शिक्षणाच्या माध्यमातून एक नवी दिशा, नव संजीवनी देण्याचे काम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलं. त्यांच्या जयंती निमित्त साजरा करण्यात येणाऱ्या बालिका दिनाच्या मराठी Messages, Wishes, Greetings, WhatsApp Stickers च्या माध्यमातून शुभेच्छा हा दिवस खास करा. यासाठी तुम्हाला खालील इमेजेस उपयोगी येतील. (2021 Holidays Calendar: नववर्षामध्ये होळी, गुढीपाडवा, गणेशोत्सव, दिवाळी ते दसरा कधी? जाणून घ्या महत्त्वाच्या सणांच्या सुट्ट्यांच्या तारखा!)
बालिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
बालिका दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
बालिका दिनाच्या मन: पूर्वक शुभेच्छा!
भारताचे उज्वल भविष्य घडवणाऱ्या सर्व
कन्यांना बालिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
लेक वाचवा, लेक वाढवा, लेक घडवा
बालिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त
साजरा करण्यात येणाऱ्या
बालिका दिनाच्या मन: पूर्वक शुभेच्छा!
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी आपलं सर्व जीवन समर्पित केलं. त्यांच्या जिद्दीमुळे आज सर्व क्षेत्रात मुलींनी भरारी घेतली आहे. पुण्यात शिक्षणाची सोय नव्हती. त्यामुले जोतिबांनी 1848 मध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली. या शाळेत काम करण्यासाठी शिक्षिका मिळत नसल्याने जोतीबांनी आपल्या अशिक्षित पत्नीला घरी आधी शिक्षण दिले. त्यांतर त्यांची शिक्षिका म्हणून नेमणूक केली. पुण्यातील फुले पतिपत्नींचे शिक्षण कार्य पाहून 1852 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारने मेजर कॅन्डी यांच्या हस्ते त्यांचा जाहीर सत्कार केला. तसेच शाळांना सरकारी अनुदानही देऊ केले.