1 जानेवारी 2021 पासून नववर्षाची सुरूवात झाली आहे. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. आपल्या देशात अनेक संस्कृती, जाती धर्माची लोकं एकत्र नांदत असताना सण-समारंभांमध्येही वैशिष्ट्य आहे. 2020 चं सालं हे लॉकडाऊन आणि कोरोनाच्या सावटाखालीच गेल्याने बहुतांशी सण आपण घरातच राहून साधेपणाने साजरे करावे लागले. पण आता नववर्षामध्ये येणारे सण हे पुन्हा पहिल्याप्रमाणे साजरे होऊ शकतात की नाही? याबाबत अजूनही आशंकता आहे. पण जानेवारी पासून डिसेंबर 2021 दरम्यान पहा भारतात मोठ्या उत्साहाने साजरे केले जाणारे काही महत्त्वाचे सण नेमके कधी आहेत? 1 जानेवारीपासून हिंदू वर्षाची सुरूवात होत असली तरीही हिंदू नववर्ष गुढी पाडव्यापासून सुरू होते. त्यानंतर महाराष्ट्र दिन, दिवाळी, दसरा आणि गणेशोत्सव देखील मोठ्या दणक्यात साजरा केला जातो. Bank Holidays in Year 2021: नववर्षात किती मिळणार सुट्ट्या आणि Long Weekends; येथे पहा संपूर्ण यादी.
2021 मधील महत्त्वाचे सण नेमके कधी?
मकर संक्रांत - 14 जानेवारी
प्रजासत्ताक दिन - 26 जानेवारी
गणेश जयंती - 15 फेब्रुवारी
अंगारकी चतुर्थी - 2 मार्च
महाशिवरात्र - 11 मार्च
धुलिवंदन - 29 मार्च
गुड फ्रायडे - 2 एप्रिल
रंगपंचमी - 2 एप्रिल
ईस्टर संडे - 4 एप्रिल
गुढीपाडवा - 13 एप्रिल
राम नवमी - 21 एप्रिल
हनुमान जयंती - 27 एप्रिल
रमजान ईद - 14 मे
बुद्ध पौर्णिमा - 26 मे
वटपौर्णिमा - 24 जून
आषाढी एकादशी - 20 जुलै
बकरीईद - 21 जुलै
महाराष्ट्र बेंदूर - 22 जुलै
गुरूपौर्णिमा - 23 जुलै
अंगारक संकष्ट चतुर्थी - 27 जुलै
श्रावण मासारंभ - 9 ऑगस्ट
नागपंचमी - 13 ऑगस्ट
स्वातंत्र्यदिन - 15 ऑगस्ट
रक्षाबंधन- 22 ऑगस्ट
कृष्ण जन्माष्टमी- 30 ऑगस्ट
गोपाळकाला - 30 ऑगस्ट
गणेश चतुर्थी - 10 सप्टेंबर
गौरी आवाहन- 12 सप्टेंबर
गौरी विसर्जन- 14 सप्टेंबर
घटस्थापना - 7 ऑक्टोबर
दसरा - 15 ऑक्टोबर
ईद ए मिलाद - 19 ऑक्टोबर
कोजागिरी पौर्णिमा - 19 ऑक्टोबर
दिवाळी - 4 नोव्हेंबर
भाऊबीज - 6 नोव्हेंबर
त्रिपुरारी पौर्णिमा - 18 नोव्हेंबर
अंगारक संकष्ट चतुर्थी - 23 नोव्हेंबर
कार्तिकी एकादशी -30 नोव्हेंबर
देवदीपावली - 5 डिसेंबर
दत्त जयंती - 18 डिसेंबर
नाताळ - 25 डिसेंबर
2021 ला सुरूवात झाल्यानंतर सहाजिकच लोकांची सुट्ट्या पाहून लग्नांसाठी, पिकनिक साठी ठिकाणं आणि प्लॅनिंग केले जातं. यंदा आपल्या हातामध्ये कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लस हाती लागल्याने हळूहळू स्थिती आहे. त्यामुळे सण साजरा करण्यासाठी तुम्ही सज्ज होत असाल तर ही सुट्ट्यांची यादी एकदा नक्की पाहा.